वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव, तालुका प्रतिनिधी -प्रवीण उद्धवराव गायकवाड
समाज, कुटुंब व्यवस्था आणि परिस्थिती यांच्याशी लढत असताना आलेले विविधांगी कठीण प्रसंग, दुःख, निराशा आणि अगतिकता यांचेवर मात करीत आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीचे भान ठेवत आपल्या छोट्या मुलांना उच्च शिखरावर घेऊन जाणे, हे अत्यंत कठीण कार्य करून सत्कारमूर्ती महिलांनी संपूर्ण समाजापुढे आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेत या महिलांनी केलेले कर्तृत्व आकाशाला गवसणी घालण्या सारखे असून अजेय असलेल्या अशा कर्तृत्ववान महिलांचा आदर्श प्रत्येक महिलांनी ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे सितनवमी निमित्त सीता मंदिर येथे आयोजित भव्य सोहळ्यात ॲड. चटप बोलत होते.
सीतानवमी निमित्त रावेरी येथील सीता मंदिर प्रांगणात स्वयंसिद्धा सीता पुरस्कार वितरण समारोह आयोजित करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामनराव चटप होते. प्रमुख अतिथी माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी महिला आघाडी प्रांताध्यक्ष प्रज्ञाताई बापट, शे.स.अध्यक्ष ललित बहाळे, स्वभाप अध्यक्ष अनिल घनवट,ॲड. दिनेश शर्मा, शैलाताई देशपांडे, अंजलीताई पातुरकर,मधुसुदन हरणे,अरुण केदार,सतीश दाणी, राजेंद्र झोटींग, सोनाली मरगडे, गजानन देशमुख, जगदीशनाना बोंडे,राजेश तेलंगे, सतीश देशमुख, विठ्ठल घाडगे,नंदू काळे,सोपान मोटघरे,राजाभाऊ पुसदेकर, बाळासाहेब देशमुख, विजय निवल,निळकंठ कोरांगे,गणेश मुटे, सुनंदा तुपकर, रेखाताई हरणे, यांच्यासह शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडीचे संपूर्ण राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
समारोहात डॉ. जयश्री खर्चे, श्रीकांतादेवी सारडा, जयश्री देशपांडे,राधा शुक्ला, सुरेखा वांढरे, मंगला लालसरे, गुंफा चीडे, शोभा अमृतकर व माया अवघडे या नऊ महिलांना मान्यवरांचे हस्ते शाल,साडी, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ व नारळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.खर्चे, देशपांडे, वांढरे व लालसरे या महिलांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव कथन केले. पती नसतांना भोगाव्या लागलेल्या यातना आणि त्यातून मार्ग काढतांना उपसलेले कष्ट याबद्दल सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाही. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना सरोज काशीकर यांनी महिलांच्या विविधांगी समस्यांवर प्रकाश टाकत या महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी शेतकरी महिला आघाडी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी ॲड. दिनेश शर्मा, अनिल घनवट, ललित बहाळे, शैला देशपांडे, प्रज्ञा बापट यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अंजली पातुरकर, संचालन महेश सोनेकर व आभार मधुसूदन हरणे यांनी मानले. शेतकरी महिला आघाडीने शपथ घेतल्यावर समारोहाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी सीता मंदिर सौंदर्य कमिटी व सीता नवमी महिला उत्सव मंडळ तसेच यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेंद्र झोटींग, गणेश मुटे, सतीश दाणी, राजाभाऊ पुसदेकर, सारंग दरणे, नामदेवराव काकडे, उध्दव चौधरी,मुकेश धाडवे, खुशालराव हीवरकर, इदरचंद बैद,यांचे सहकार्य मोलाचे ठरले. या समारोहात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...