Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव येथे रमजान...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी.

मारेगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी.

गौसिया ईदगाह कब्रस्तान येथे मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज केली अदा || ईद मुबारक भाईजान’ दोन वर्षांनंतर पुन्हा गळाभेट!

सोमवारी ( 2मे) रोजी ईदचा चंद्र दिसला होता. त्यानंतर आज संपूर्ण देशभरासह मारेगाव शहरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळला.

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांची सर्वात पवित्र असलेला रमजान महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव महीला, पुरूष व पाच वर्षा वरील बालक या पवित्र महीन्यात महीना भर उपावस (रोजे) काही ही खाता व पणी न पीता दिवस भर उपवास करित आसतात या पवित्र महिन्याला फार मोठे महत्त्व असून या महीन्यात जकात,(पैसे) फित्रा (अन्यधान्य ) मुस्लिम बांधव आपल्या आमदणीचा ऐक भाग गोरगरीब गरजवंताला दान करीत असतात.या महीन्यात नमाज,जकात,रोजे ,कुराण शरीफ चे पठण, मुस्लिम बांधव या महिन्यात करीत असतात.

कोरोना महामारीनंतर  देशासह जगभरासह मारेगावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी  केली गेली.  गौसीया ईदगाह कब्रस्तान मध्ये कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ईदच्या निमित्तानं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. ईद-उल-फित्रच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवन एकत्र येतात आणि  गौसिया ईदगाह कब्रस्तान येथे नमाज अदा करतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीचं संकट होतं. त्यामुळे मारेगाव येथे मज्जिद, मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. 

मुस्लिम बांधवांना साधेपणानंच कोरोना काळात ईद साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र राज्यासह देशातील कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरासह मारेगावात ईद साजरी केल्या गेली. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळालाय. यावेळी मुस्लिम बांधवांना सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. दोन वर्षानंतर गौसिया ईदगाह कब्रस्तान येथे नमाज अदा करण्याची संधी मिळाल्याचं समाधानही यावेळी मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवलंय. अनेकजण आपल्या संपूर्ण कुटुंबासह गौसिया ईदगाह कब्रस्तान येथे आले होते.


देशासह मारेगाव तालुक्यात शांतता नांदावी आणि सगळेच जण एकमेकांशी प्रेमानं, आपुलकीनं वागावेत, यासाठी प्रार्थना केल्यानं एका मुस्लिम बांधवानं  बोलताना म्हटलंय. देशात शांतता नांदावी आणि राजकारण्यांनी धर्माच्या नावावर लोकांना एकमेकांपासून तोडू नये, असं आवाहनही केलंय. दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर गौसीया ईदज्गाह कब्रस्तान परिसरात  पोलीसाचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

 

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...