Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / तालुक्यात वीज, पाणी,...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

तालुक्यात वीज, पाणी, रस्त्यांची अवस्था फार वाईट साहेबांची प्रतिष्ठा नेहमी पनाला.

तालुक्यात वीज, पाणी, रस्त्यांची अवस्था फार वाईट साहेबांची प्रतिष्ठा नेहमी पनाला.
ads images

झरी:- तालुक्यात खेडेगावाला जोडणार्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. गणेशपुर कोसारा मार्की ते झरी, खडकी ते अडेगांव, डोंगरगाव, येडशी, मांगूर्ला, हीरापुर, अडकोली, दूर्भा, आमलन, पिंप्रडवाडी ,दाभाडी अशा खेडे गावांना जोडणारे तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले असून प्रशासन मात्र लक्ष देत नाही. जिल्हा परिषद सदस्य नुस्ती आश्वासन देते की काय असे वाटते. दोन वर्षांपासून पिंप्रडवाडी रस्ता गावाला जोडणारा करूण देतो म्हणून नुसतं आश्वासन देत गेले. अनेक वेळा रस्ता मंजूर झाला सांगितले परंतु गीट्टी,डांबरचा खडाही पडला नाही.   एकदाच नाही तर वारंवार करूण देणार म्हटले. पन काहीच करण्यात आले नाही. आमदार च्या बाबतीत विचार केल्यास तर निवडणुका आल्या की उद्घाटनाचा सपाटा लावला जाते. साधी गोष्ट आहे समजून घ्या आमदार साहेब. लोकांना लाभदायक कामे जर चांगली करून दाखवली तर प्रतीष्ठा पानाला लावायची गरज पडत नाही. आपोआप काम करणार्या  व्यक्तीस जनता निवडून देईल.

  तालुक्यात सद्यचा जरी विचार केला तर विज,पाणी, रस्ते या तिन्ही गोष्टींचा तुटवडा जाणवतो. तालुक्यात वारंवार वीज गुल होत आहे . पाणीपुरवठा समश्या अनेक गावांत दिसते कडक उन्हाळ्यात पाण्याची धावपळ. आणी रस्ते तर वार्षिक करा व दर वर्षी खड्डे भरा. अनेक ठिकाणी बोगस कामे रस्त्याची केली म्हणून एक वर्षातच रस्ते खड्डेमय झाले. झरी जिल्हा परिषद व आमदार साहेबांनी या गोष्टीचा नक्की विचार करायला पाहीजे. डोळ्या समोर उदाहरण आहे पिंप्रड वाडी येथे आमदार निधी अंतर्गत समाज मंदिर शेड बनविले आहे. दोन अडीच लाख रूपयात सारवासारव करून मोकळे झाले. कूठे गेले पाच,सहा लाख. असे कामे कराल तर प्रतिष्ठा पनाला वारंवार लागेल. कधी कधी कमाल वाटते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पासून तालुक्यातील जनतेने फक्त तिनच गोष्टी मागीतल्या  वीज, पाणी, रस्ते परंतु आजही तिन गोष्टी ची समश्या कायमच राहात आहे. आज पर्यंत निवडणूका कीतीदा झाल्या. 

कामाला महत्व दिले असते तर चूरशीच्या व प्रतिष्ठेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले नसते. हे मात्र तितकेच खरे व सत्य आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले सारे नेते पुढारी चातकासारखी निवडणुकीची वाट पाहत आहे. यावरून असे दिसते की कामा पेक्षा निवडणुकीला ज्यास्त महत्व देतात. या पुढे जनतेनेही ठरवून घ्यायला पाहिजे जो बाटेगा दारू नोट उसको कभी ना देना वोट. तेव्हाच काहीतरी बदल पाहायला मीळेल.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...