Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / जड वाहतुकीच्या विरोधात...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

जड वाहतुकीच्या विरोधात खैरीत चक्काजाम आंदोलन ।। आर.टी.ओ. ला दिले मागण्यांचे निवेदन

जड वाहतुकीच्या विरोधात खैरीत चक्काजाम आंदोलन ।। आर.टी.ओ. ला दिले मागण्यांचे निवेदन

प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातून सुरू असलेल्या कोळसा तसेच वाळूच्या जड वाहतुकी विरोधात खैरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन केले होते. परीणामी जवळपास एक ते दीड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वता आंदोलनाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

गेल्या काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून कोसारा खैरी मार्गे वणी तसेच घुग्गूस आदी ठिकाणी कोळशाची अवजड वाहतूक दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच लगतच्या कोसारा व सोईट या शासन लिलाव झालेल्या वाळू घाटातून देखील काही दिवसांपासून वाळूची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे कोसारा ते खैरी तसेच खैरी ते वडकी व खैरी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील गावातुन जाणाऱ्या ८०० मीटर अंतराच्या सिमेंट रोडची अक्षरशः चाळण झाली असल्याने हि जड वाहतूक पुर्णतः बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यापुर्वी तालुका प्रशासनाकडे खैरी वासियांनी दिली होती.

मात्र तालुका प्रशासनाने खैरी ग्रामस्थांच्या मागणीला केळाची टोपली दाखविल्याने अखेर निवेदनकर्त्यांनी रास्तारोको आंदोलनाचा पवित्रा उगारत आज २९ एप्रिल रोजी खैरी येथील बाजार चौकात विनोद माहुरे यांच्या नेतृत्वात वरोरा ते वडकी हा राज्य मार्ग जवळपास दीड तास अडवून धरला होता.

दरम्यान अवजड वाहतूकीवर आळा घालावा.तसेच या मार्गावर आठवडी बाजारासह शाळा व कॉलेज असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळचे मोटर वाहन निरीक्षक किरण कुमार लोणे यांना देण्यात आले. दरम्यान खैरी परीसरात पुढील एक महिना आर.टी.ओच्या विशेष दोन पथकाकडून वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितल्या गेले.

या आंदोलनात खैरी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ.किरण तृशांत महाजन, सदस्या सौ.रमाताई वनकर यांच्या सह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. दरम्यान वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...