आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): गेल्या दोन वर्षापासून ज्याप्रमाणे कोविड विरूद्ध लढा देतांना एकत्रितपणे नियमांचे पालन व लसिकरणामुळे आपण कोरोना आजारावर नियंत्रण मिळविले त्याचप्रमाणे बालकांमधील जंताचा नाश करण्यासाठी 19 वर्षाखालील सर्वांनी जंतनाशक मोहिमेत जंतनाशकाची गोळी घ्यावी. एकजुटीने उपाययोजना केल्यास मुलांमधील जंताच्या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यक्त केले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन व जागतिक हिवताप दिन निमित्त शिवाजी हायस्कुल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या देवून राष्ट्रीय जंत नाशक मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक हिवताप दिननिमित्त हिवताप कार्यालया पासून शिवाजी हायस्कूल, स्टेट बँक चौक पर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचेसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, आरोग्य सेवा उपसंचालक कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढे सांगितले की जागतिक आरोग्य संघटनेच्या दाखल्यानुसार 19 वर्षाखालील 68 टक्के विद्यार्थ्यांमध्ये जंताचा त्रास असतो. जंतामुळे रक्ताक्षय होउन रोगप्रतिकार क्षमता व बौद्धिक आकलन क्षमता कमी होणे तसेच इतर आजार होऊन बालकांचा शारिरिक व मानसिक विकास खुटंतो. यासाठी सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शाळाबाह्य मुलांना जंतनाशकाची गोळी देण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. जंताच्या गोळीचे महत्व जाणून सर्वांनी जंताच्या गोळीच्या सेवन करावे, असे आवाहन त्यांनी केले. जंत व हिवताप आजारावर प्रतिबंध हाच पर्याय असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी कोविड लसिकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या पालकांचे लसिकरण पुर्ण करून घेण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हिवताप तसेच ड्येंग्यु, मलेरिया व इतर आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घरात व परिसरात नियमित स्वच्छता बाळगण्याचे तसेच डासांची अंडी नष्ट करण्याचे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणातून जंतनाशक दिन व जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले हात नियमित स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत पाटील यांनी केले.
याप्रसंगी माताबाल संगोपान अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, डॉ. तनवीर शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, डॉ. मनोज तगडपल्लेवार, मुख्याध्यापक श्री. मडावी, श्री. देवतळे, डॉ. प्रीती दुधे, डॉ. नाजीया काझी, आरोग्य कर्मचारी धीरज पीसे, धनंजय मेश्राम, अनिल परचाके, दिलीप मेश्राम, शाईना शेख, सुवर्णा नाईक, शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...