वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी-प्रवीण उद्धवराव गायकवाड
राळेगाव आज दिनांक 22/04/2022 रोजी पहाटे ठाणेदार विनायक जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक हेड पोलीस अमलदार यांच्यासह वडकी परिसरात रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना धानोरा येथे पोहोचले असता गोपनीय माहितीनुसार माहिती प्राप्त झाली की , रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कळब येथील दोन इसम पल्सर मोटरसायकलवरून देशी दारूचा साठा विक्री करणे करिता वाहतूक करून धानोरा येथे घेऊन येत आहे अशी माहिती वरुन ठाणेदार विनायक जाधव यांनी धानोरा राळेगाव कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबले असता सकाळी साडेपाच वाजता च्या सुमारास माहितीप्रमाणे राळेगाव रोड वरून एक मोटर सायकल ज्यावर दोन इसम बसून असलेले व त्यांच्या मधोमत दोन पोते भरून घेऊन येताना दिसून आले करिता त्यांना पोलिसांनी हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता नमूद मोटरसायकल चालकाने पोलिसांची तपासणी चालू आहे हे पाहताच पोलीस यांचे इशारा चे उल्लंघन करून त्यांची मोटरसायकल न थांबता भरधाव वेगात पोलिसांना कट मारून बेधाम पळ परून जाण्याचा प्रयत्न केला, करिता पोलिसांनी सदर मोटरसायकल चालकास पाटलाग केला असता मोटरसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाली पडले त्यामध्ये मोटरसायकल च्या मागे बसून असलेले इसम पळून गेला व मोटर सायकल चालवत असलेला घटनास्थळी मिळून आला त्यानुसार वडकी पोलिसांनी त्यास सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन रोड वरील मोटरसायकल व अवैध दारूचे पोते एका बाजूला करून त्यास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नाव गोपाल राजू बोभाटे वय 21 वर्षे रा.धनगर पुरा, वार्ड क्रमांक 7 कळम असे असल्याचे सांगितले तसेच पळून जाणारे इसमाचे नाव रोहन असूतकर असे असल्यास सांगितले त्यानुसार पोलिसांनी पांच्या समक्ष त्यांचे मोटरसायकल वरील पोत्यांचे पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू गोवा नंबर वन संत्रा कंपनीचे 180 समतेचे 169 काचेच्या किंमत 10,140 /--रुपयाचे आढळून आले नमूद इसमास दारू बाळगण्याचा वाहतूक करण्याचा तसेच विक्री करण्याचा परवाना आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली असता त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे पंचांसमक्ष नमूद केल्याने सदर इसमाचे कर्जातून देशी दारूचे 169 काचेच्या शिष्या 10140/--रुपयाचे तसेच दारू वाहतूक करणे करीता उपयोगात आणलेली मोटरसायकल बजाज कंपनीचे पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 05 DD30 76 किंमत 80000/_ असा एकूण 90 हजार 140 /-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला व वरील आरोपी यांना कायदेशीर रित्या ताब्यात घेण्यात आले व नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वडकी येथे कलम 65 (अ)(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 184, 239 /177, 130 (१)(३)/ 177 मोटार वाहन कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव हे स्वतः करीत असून सदर प्रकरणांमध्ये नमूद दारूसाठा कुठून आणला सदर प्रकरणामध्ये आणखी कोणते आरोपी सहभागी आहेत का? सदर दारूचा साठा नेमका कोणाला विक्री करणार होते या सर्व बाबी उघड होणार आहेत सदर चे कामगारी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव पोलीस कॉन्स्टेबल विकास धडसे, आकाश गोडसे,विजय बशवेशंकर व चालक यांनी पार पाडली आहे या कामगिरीची सर्व स्तरावरून वडकी पोलीस स्टेशनचे कौतुक करण्यात येत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...