आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू होऊन एक तपाचा कालावधी लोटत आला आहे. या कालावधीत गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी गावागावांमध्ये तंटामुक्ती गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या या समित्या केवळ फक्त कागदावरच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात 15 ऑगस्ट 2007 मध्ये तत्कालीन दिगवंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावात तंटे निर्माण होऊ नयेत. व निर्माण झालेले तंटे गावातच मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान सुरू केले होते.व गावात शांतता निर्माण करून जातीय व सामाजिक तेढ कमी व्हावे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले व या अभियानाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यात आले होते.
या अभियानाअंतर्गत गावागावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात आली.परंतु आता या योजनेला सुरू होऊन अनेक वर्षाचा कालावधी लोटला असून गावागावात तंटामुक्ती गाव समिती स्थापन झाल्या असल्या तरी गावागावांमध्ये प्रत्यक्षात आजही अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे.
अनेक गावांमध्ये दारू विक्री होत असल्याचे वास्तव कोणालाही नाकारता येत नाही. अवैध धंद्यांमुळे तंटे वाढतात मग तंटामुक्त गाव कसे होणार ? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना उपस्थित होत आहे.
गावागावात तंटामुक्ती गाव समितीची स्थापना झाली असली तरी अनेक गावात तंटे कायम असून याकडे संबंधिताची दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु काही गावात तंटामुक्ती अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची निवड होताना निवडीवेळी शासनाने दिलेले नियम व निष्कर्षाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. तंटामुक्त गाव समिती मध्ये राजकीय पुनर्वसन केले जात असल्याने योग्य सदस्यांची निवड होत नाही. परिणामी या समितीच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे.तंटामुक्ती गाव समिती पदाधिकारी व सदस्यांच्या निवडीकरिता निकष देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावातील तंटामुक्त गाव समिती केवळ नावालाच असल्याचे दिसून येते.
प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समिती असून तंटामुक्त गाव समितीकडून गावातील तंटे गावातच सोडवण्याकडे व अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनात येते. तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाची निवड गाव प्रतिनीधी म्हणजे ग्रामपंचायत मधून समिती बनविण्यात येते परंतु ग्रामपंचायत मध्येच तंटा अधीक असतात. तर गावातील तंट्याकडे लक्ष कमीच.
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी समित्याच्या पदाधिकारी यांच्यासह पोलिसांनाही सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे, तरच शासनाने सुरु केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान यशस्वी होईल. यामुळे छोट्या छोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात येणार नाहीत हे मात्र विशेष पण यात काही त़टामुक्ती अध्यक्ष गावात काही तंटे घडले तर घरातुन पहातात किंवा स्वताच गावात तंटे करतांना दिसतात याला काय म्हणावे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...