वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्ताक्षयाचा आजार कमी होवून आरोग्यात सुधारणा होते व बालकांचा शारिरीक व मानसिक विकास होवून अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढत. त्यामुळे येत्या 25 तारखेला 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या 25 एप्रिल रोजी शासकीय व खाजगी अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात तसेच शाळाबाह्य मुलांना समुदाय स्तरावर अल्बेंडाझोल ही जंतनाशक गोळी देण्यात यावी. या दिवशी सर्व मुले शाळेत उपस्थित राहीतील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या किंवा आजारपणामुळे किंवा अन्य कारणामुळे हे औषध देण्यात न आल्यास 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मॉप-अप दिनी ते शाळा महाविद्यालयात व घरोघरी जावून देण्यात यावे.
हे औषध बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी शासनामार्फत मोफत देण्यात येते. याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने शासकीय किंवा खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशकाचे औषध देण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जंतामुळे होणारे त्रास व औषधाचे परिणाम व महत्व पालकांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
बैठकीला डॉ. किशोरी जोशी-केळापुरे, अनिल शेंडगे, डॉ. प्रिती दुधे, डॉ. संदिप भटकर, वैशाली चोरमले, किरण ठाकरे, सचिन बोपाने, जलालुद्दिन गिलाणी, प्रशांत पाटील तसेच आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...