Home / यवतमाळ-जिल्हा / *आपले संविधान भाग-६*...

यवतमाळ-जिल्हा

*आपले संविधान भाग-६* ???????? ???? *भाग-पहिला : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र*

 *आपले संविधान भाग-६* ????????   ???? *भाग-पहिला : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र*
ads images
ads images
ads images

भारतीय वार्ता :
       आजच्या भागात आपण आपल्या भारतीय संघराज्यात 'नवीन राज्ये दाखल' किंवा 'स्थापन' करण्यासंदर्भात असलेले 'अनुच्छेद-२' पाहुया....
    *अनुच्छेद-२:- नवीन राज्ये दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे.-*
    संसदेला, तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्ये संघराज्यामध्ये दाखल करुन घेता येतील किंवा स्थापन करता येतील.
   *२(क):-* [सिक्कीम हे संघराज्याशी सहयोगी करणे] "संविधान (छत्तीसावी सुधारणा) अधिनियम, १९७५ कलम ५ द्वारे निरसित (२६ एप्रिल, १९७५ रोजी व तेव्हापासून).
    'अनुच्छेद-२' हा भारतीय राज्यक्षेत्राबाहेर असलेल्या 'इतर राज्यक्षेत्रांना' भारतीय संघराज्यात सहभागी करून घेण्यासंदर्भात आहे. अशा राज्यक्षेत्रांना, संसदेला योग्य वाटतील, अशा 'अटी' आणि 'शर्तींवर' कायद्याद्वारे भारतीय राज्यक्षेत्रात सहभागी करून घेण्याचा अधिकार आहे. असे क्षेत्र भारतात सहभागी करून घेण्यासंदर्भात देखील या अनुच्छेदात 'दोन शब्दां'चा वापर करण्यात आलेला आहे. एक म्हणजे 'दाखल करून घेणे' व दुसरा 'स्थापन करणे'. 
    'दाखल करून घेणे' चा अर्थ आहे- 'प्रवेश देणे'. म्हणजेच भारत त्या राज्यक्षेत्रांना सुद्धा आपल्यात सहभागी करून घेऊ शकतो, जे अगोदर पासूनच 'स्वतंत्र राजकीय एकक' म्हणून अस्तित्वात आहे. तसेच 'स्थापन करण्याचा' अर्थ आहे की, असे एखादे राज्यक्षेत्र, की जे अगोदरपासून राजकीय एकक नाही, परंतु सहभागी करून घेतल्यानंतर, त्याला एक नव्या राज्याच्या स्वरूपात स्थापन करणे.
    आता असे कोणते राज्यक्षेत्र होते, की जे स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतात नव्हते आणि नंतर ते भारतात सहभागी करून घेण्यात आले. आपल्या देशावर इंग्रजांप्रमाणेच काही ठिकाणी पोर्तुगीज, फ्रेंच यांचेदेखील राज्य होते. आपण वेगवेगळ्या 'मोहिमा' राबवून ते ते क्षेत्र त्यांच्याकडून 'हस्तगत' करून आपल्या देशात सामील करून घेतलेले आहेत. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले 'गोवा, दिव, दमन, नगर हवेली' आदी राज्यक्षेत्रे आपण ताब्यात घेतली. परंतु ह्या राज्यक्षेत्रांना स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्यांना 'केंद्रशासित प्रदेश' म्हणून मान्यता देण्यात आली. म्हणून या क्षेत्रांसाठी 'अनुच्छेद-२' चा वापर न करता, 'अनुच्छेद-३६८' नुसार पहिल्या अनुच्छेदात घटनादुरुस्ती करून ही राज्यक्षेत्रे 'केंद्रशासित' म्हणून घोषित करण्यात आली.
    फ्रेंच लोकांचा 'पॉंडिचेरी, माहे, यमन, करिकाल, बंगालमधील चंद्रनगर' आदी क्षेत्रांवर ताबा होता. 'ही' राज्यक्षेत्रे आपण त्यांच्याकडून ताब्यात घेऊन, 'पांडेचरी, यमन, माहे आणि करिकाल यांचा 'एक संयुक्त' 'केंद्रशासित प्रदेश' बनवला. इथे पण 'अनुच्छेद-२' ऐवजी 'अनुच्छेद-३६८'चाच वापर झाला. परंतु 'चंद्रनगर' बंगालच्या जवळ असल्याने '१९५४' मध्ये त्याला 'बंगाल राज्यात' सहभागी करून घेताना सर्वप्रथम 'अनुच्छेद-२' चा वापर करण्यात आला.
   'सिक्कीम' हे एक स्वतंत्र असे 'राजेशाही राष्ट्र' होते. भारताप्रमाणेच इथेही इंग्रजांचा अंमल होता. १९४७ मध्ये ब्रिटिश अंमल गेल्यानंतर ओघाओघाने ब्रिटिशांची सिक्कीममधील 'जबाबदारी' भारताने उचलली. १९५० मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार 'सिक्कीम' हे भारताचे 'रक्षित राज्य' बनले. तेव्हापासून सिक्कीमवरील भारतीय प्रभाव वाढला. भारताने सिक्कीमच्या 'संरक्षण, परराष्ट्रीय धोरण व संदेशवहनाची' जबाबदारी घेतली. सिक्कीमच्या 'आर्थिक व सामाजिक' विकासासाठी भारताने मदत केली. 
    सिक्कीमच्या जनतेचा सुरवातीपासूनच असलेला 'कौल' लक्षात घेता, भारतीय सैनिकांनी सिक्कीमच्या 'चोग्याल राजाच्या' राजवाड्याला 'वेढा' घातला. भारतीय सैन्याने राजवाड्यात असलेल्या अवघ्या '२४३ सैनिकां'वर सहज ताबा घेतला. त्यानंतर 'सिक्कीम' राज्याला भारतात सहभागी करून घेण्यासंदर्भात तिथल्या जनतेचे 'जनमत' तपासले गेले. तेथील '९७.५% मतदारांनी' सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे '२६ एप्रिल १९७५' रोजी '३६ वी घटनादुरुस्ती' करून सिक्कीमला भारतात सहभागी करून घेण्यात आले. १६ मे १९७५ रोजी भारताचे 'बावीसावे घटकराज्य' म्हणून 'सिक्कीम' भारतात सामील झाले.
      *क्रमशः*
              *संकलन-नुरखॉं पठाण*
              *गोरेगाव रायगड*
              *7276526268*

Advertisement

???????? *ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करून संविधान जनजागृती मोहिमेत सहभागी व्हा* ????????

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...