आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव (18 एप्रिल) :- गेल्या चाळीस वर्षा पासुन एक हाती सत्ता असलेल्या मारेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर यंदा परिवर्तनाची लाट आली.आज झालेल्या निवडणुकीत संजय देरकर,गजानन कीन्हेकार,गौरीशंकर खुराणा गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या तेराही उमेदवाराचा बहुमताने दणदणीत विजय झाला.
जवळपास 15 गावांचा समावेश असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठी, करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या मारेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 13 प्रतिनिधीची आज 17 एप्रिल रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात 1475 सभासद मतदारा पैकी 1103 सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या सोसटीवर जवळपास गेल्या चाळीस वर्षा पासुन नरेंद्र पाटील ठाकरे गटाच्या पॅनलचे वर्चस्व होते.मात्र यावेळी मारेगाव सोसायटीवर परिवर्तनाची लाट आली.व अखेर गेल्या चाळीस वर्षा पासून मारेगाव सोसायटीवर चालत असलेले शेतकरी विकास पॅनल चे ट्रक अखेर फेल पडले.व संजय देरकर व गौरीशंकर खुराणा,गजानन कीन्हेकार, गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनल चे हेलिकॉप्टर अखेर मारेगाव सोसायटीवर बसले.
यात महिला राखीव प्रतिनिधी उमेदवार म्हणून सौ.सुनीता तुळशीराम मस्की,सौ.मनीषा मारोती टोंगे तसेच इतर मागास प्रवर्गात काशिनाथ शामराव खडसे, भ.जा.ज/वि.मा.प्रावर्गातून प्रवीण अशोक बरडे, अनु.जाती/जमाती प्रवर्गातून दामोदर लक्ष्मण किनाके तर सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील प्रतिनिधी उमेदवार प्रवीण साईबाबा बोबडे,दिवाकर महादेव डुकरे,सुनील पतिराम गायकवाड, गजानन पाडुरंग घोटेकर,गजानन मारोतराव किन्हेकर,रवींद्र वसंतराव पोटे,चेतन बाबाराव पारखी,प्रवीण कवडू शेंडे या शेतकरी परिवर्तन पॅनल च्या तेराही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...