Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शेतकरी हिताच्या योजना...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शेतकरी हिताच्या योजना कृषी व महसूल विभागाने राबविण्यात कसूर करु नये आमदार प्रा.डॉ. अशोकराव उईके

शेतकरी हिताच्या योजना कृषी व महसूल विभागाने राबविण्यात कसूर करु नये आमदार  प्रा.डॉ. अशोकराव उईके

कृषी विभागाचा घेतला खरीप हंगामपूर्व आढावा

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार ज्या योजना राबवितात त्या योजना कृषी विभाग व महसूल विभागानी शेतकऱ्यांच्या गावात जाऊन समजावून सांगाव्या. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तालुक्यात किती गांवा मंध्ये राबविली किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला . याच बरोबर येणाऱ्या खरीप पिकाचा आढावा दिं  १३ एप्रिल २०२२ बुधवारला  तालुका कृषी कार्यालयात आमदार प्रा.डॉ अशोकराव उईके यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला . आढावा बैठकीला तहसीलदार रवींद्रजी कुमार कानडजे तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी गटविकास अधिकारी मडावी जि.प. सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे प.स. सभापती प्रशांतभाऊ तायडे ' डॉ. कुणालभाऊ भोयर कृषी विभागातील कर्मचारी उपस्थीत होते.

 तालुक्यातील २००८ - ०९ या वर्षातील शेतकरी अद्याप ही कर्जापासून वंचीत आहे. या बाबत शासनाचे काही निर्देश आले का तुमच्या स्तरावरून कार्यवाही करावी . शेतक-यांना पिक विमा काढण्यासाठी आग्रह धरावा त्याचे फायदे त्यांना समजावून सांगावे . नियमीत कर्जाची रक्कम भरणा करणा-या शेतक-यांना महाराष्ट्रातील आघाडी सरकार ५० हजार प्रोत्साहन देणार असे जाहीर केले होते . ते शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा झाले का या बाबत उपस्थीत अधिका-याना विचारणा केली यावर अद्याप एकालाही लाभ मिळाला नाही असे उत्तर आले.

वयोश्री योजना , किसान सन्मान योजना प्रधानमंत्री गरीब कल्यान कारी  योजना प्रधान मंत्री श्रमयोगी योजना , जल जिवन मिशन योजना ग्रामीन भागात घर घर मे नळ ईश्रम योजना या योजनांची माहिती घेण्यात आली . प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सद्य स्थिती ची माहीती घेण्यात आली व कृषी विभागाने जबाबदारीने काम करावे . प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करने सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले.

याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने पिक विमा काढणे का गरजेचे आहे यासंदर्भात त्यांना माहिती देणे त्याचा प्रचार करणे गरजेचे आहे. मान्सून पूर्व खरीप पिकांच्या संदर्भात  शेतकऱ्यांना कृषी विभाग काय माहिती देणार कोणते वाण लावलं पाहिजे शेती मध्ये काय बदल केले पाहिजे शेतकऱ्यांनी शेती करताना पिकांची कोणती काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात कृषी विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावात  महसूल कर्मचार्‍यांच्या मदतीने गावागावांमध्ये जाऊन माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेती मध्ये होत असलेले बदल हवामान याची माहीती देण्यात यावी आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या संदर्भात आमदार प्रा डॉ. अशोकराव उईके यांनी सुचना व मार्गदर्शन केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...