आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ एप्रिलच्या रात्री घडली यावरून मुकूटबनपोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. मुकूटबन येथून ७ किमी अंतरावरील मांगली येथील गेट क्र २२ सी वर गेटमॅन म्हणून रेल्वे कर्मचारी धर्मेंद्रकुमार सिम्भूदयाल मीना वय २८ वर्ष रा, रेल्वे कॉलनी मुकूटबन हा सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजताच्या शिफ्टमध्ये ड्युटीवर होता.
रात्री ८.४० वाजता दरम्यान रेल्वे येत असल्याचा कॉल आला. त्यामुळे रेल्वेगेट कुणीही ओलांडू नये याकरिता धर्मेंद्रकुमार याने रेल्वेगेट खाली केले. तेवढ्यात मुकूटबन येथील राहुल दुर्गे नामक मुलगा अंदाजे वय २८ वर्ष दुचाकी क्र एपी ०१, एसी ४५१८ घेऊन मद्यधुंद अवस्थेत आला व रेल्वे फाटक उघड असे म्हणून अश्लील शिवीगाळ देणे सुरू केले. रेल्वे गाडी गेल्याशिवाय फाटक उघडणार नाही व पाच मिनिटात रेल्वे गाडी जाणार आहे. रेल्वेगाडी जाताच फाटक उघडतो असे म्हणताच राहुल दुर्गे याने अंगावर धावत येऊन कर्मचारी धर्मेंद्रकुमार याला लाथाबुक्यांनी नाकावर व तोंडावर जबर मारहाण केली.
त्यात धर्मेंद्रकुमार यांच्या नाक व तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या व गंभीर जखमी झाला. मारहाण करत असताना धर्मेंद्रकुमार याने आरडाओरड केल्याने राहुल दुर्गे दुचाकी घेऊन पळून गेला. काही वेळातच त्याच गेटवर ड्युटी करणारे कर्मचारी संजय लेडांगे, राकेश ताडुरवार व रंजितकुमार सिंग आले.
रंजितकुमार सिंग यांच्यासोबत पोलीस स्टेशन गाठून राहुल दुर्गे विरुद्ध वरील प्रमाणे तक्रार दिली. यावरून मुकूटबन पोलिस स्टेशन गुन्हे दाखल. जखमी धर्मेंद्रकुमार याला पांढरकवडा येथे पाठविण्यात आले. मांगली रेल्वेगेट वरील फटकाजवळ तसेच त्या परिसरात लाईटची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण ड्युटी कर्मचारी याना होत आहे.
जनतेला रेल्वेगेट दिसत नसल्याची ओरड करून उपस्थित कर्मचार्यसोबत लोक हुज्जतबाजी सुद्धा करतात. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सकवान ,संदीप कुमरे ,प्रवीण तालकोकुलवार, संजय खांडेकर करीत आहे
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...