वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी- तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कानडजे यांनी आपल्या राळेगाव येथील शासकीय निवासस्थानी सुंदर परसबाग फुलविली असून त्यात विविध प्रकारचे फुलझाडे,फळांची झाडे,औषधी वनस्पती आदी झाडे लावली आहेत यातील बहुतांश झाडे ही घरीच तयार केलेली असल्याने व घरी लागणारा भाजीपाला यातून मिळत असल्याने निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी फुकट देतो प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची गरज नाही असे तहसीलदार डॉ रवींद्रकुमार कानडजे यांचे म्हणणे आहे।।।तहसीलदार कानडजे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी चिकू,पेरू,आवळा,आंबा,फणस,क forरवंद,कडीपत्ता ,लिंबोनी, गवती चहा,वाळा, भोपळा,दोडका,फुलकोबी,वांगे,कांदे,टोमॅटो,मिर्ची,आदी भाजीपाला, फळांची व औषधी वनस्पतींची झाडे लावली आहेत यातील बहुतांश झाडांची रोपे ही घरीच बियातून तयार केली आहे निम्बु खाल्ले की त्याचे बी मातीत टाकायचे त्याची काही दिवस काळजी घ्यायची व त्यातूनच रोप तयार करायचे बहुतांश झाडांची रोपे याच पद्धतीने घरी आणलेल्या भाजीतून तयार केली आहे तसेच रोप तयार झाले की त्याला कुठलाही रासायनिक फवारा ,किंवा खत द्यायचे नाही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने कानडजे यांनी ही परसबाग तयार केली आहे
जास्तीत जास्त गांडूळ खत परसबागेत वापरण्यात आले आहे वांग्याची पाच प्रकारची झाडे तहसीलदार यांच्या परसबागेत आहे घरी लागणार बहुतांश भाजीपाला तहसीलदार यांना आपल्या पराबागेतूनच मिळतो तसेच ज्याठिकाणी तहसीलदार राहतात त्याठिकाणी जमिनीत वरपासून खालपर्यंत मुरूम होता त्यामुळे परसबाग तयार करण्यासाठी तहसीलदार यांनी सुरवातीला चांगल्या जाडीचा मातीचा बेड घराच्या सभोवताली तयार केला व नंतर त्यावर परसबाग फुलविली हे विशेष परसबाग तयार करण्यामध्ये तसेच तिचे व्यवस्थपण करण्यामध्ये तहसीलदार यांची पत्नी वर्ग एकच्या अधिकारी असलेल्या स्मिता यांचीही साथ त्यांना मोठ्या प्रमाणात मिळते त्यांचे बिटेक असल्याने यात त्यांना विशेष आवड आहे आपण जे काही करतो त्याचे निरीक्षण मुल करीत असतात तसे संस्कार त्यांचेवर होतात त्यामुळे या कामामध्ये तहसीलदार मुलांना सुद्धा सोबत घेतात त्यांच्या मुलांनी बागेत किल्ला ही तयार केला आहे आपली संस्कृती ही बहुपिक पद्धतीची आहे तसेच पिकाची फेरपालट करणे आवश्यक आहे आपण वारंवार एकच पीक घेतो त्यामुळे आपल्याला उत्पादन ही कमी मिळते व जमीन नापीक होते असे तहसीलदार यांचे म्हणणे आहे त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वारंवार पिकाची फेरपालट करावी असेही तहसीलदार शेवटी शेतकऱ्यांना सांगतात.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...