वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव तालुका प्रतिनिधी: राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर ते मोहदा रोड झाडगाव परिसरात अनेक गावांना पांढरकवडा निघण्याकरीता शाॅर्टकट असल्याने या रोडने वाहनांची वर्दळ सुरू असते.अशातच मागील अवनी वाघीनच्या हौदोसामुळे मागील काही दिवसांपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी कमी झाला होता.परत वनविभागाने अवनी वाघीनचा बंदोबस्त केल्यानंतर मात्र या परिसरातील नागरिकांनी व वाटसरूनी सुटकेचा श्वास सोडला होता.आणि परत या परिसरातील जनता बिनधास्त प्रवास करायला लागली होती,शेती करायला लागली होती. अशातच परत जंगलात एक वाघ असल्याची चर्चा सुरू झाली होती.
पण कुठल्याही प्रकारच्या जनावरांना, मनुष्याला जिवितहानी न झाल्याने किंवा प्रत्यक्ष पाहील्याचा पुरावा मिळत नसल्याने त्या गोष्टीला दुजोरा मिळत नव्हता.अशातच लगीनघाई,येणे जाणे करणारे प्रवासी ये जा करायला लागले असताना वरूड जहांगीर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री तुळशीराम वडते व सौ बेबी तुळशीराम वडते हे 9/4/2022 रोज शनिवारला सायंकाळी 5 ते साडेपाच वाजता दरम्यान मोहदा येथून वरूड जहांगीर कडे मोटारसायकलने येत असताना त्यांना वाघढोडा नाल्यावर रस्त्यालगत झाडाजवळ वाघ दिसला,वडते आणि वाघातील अंतर हे विस ते पंचवीस फुटांचे होते अशातच नाल्यावरच त्यांची बाईक बंद पडली, गाडी सुरू होत नव्हती वाघाची आणि वडते यांची प्रत्यक्ष नजरानजर होत होती, .परंतू वडते यांनी हिम्मत न सोडता व वाघाला पाठ न देता अप्रत्यक्ष वाघाकडे नजर ठेवून मोठ्या मुश्किलीने गाडी सुरू करून तो रस्ता गाठला व त्यानंतर त्यांनी गावात आपबिती सांगितली.
हा वाघ नर जातीचा असून तुळशीराम वडते यांच्या सांगण्यावरून वाघ म्हातारा असल्याने त्या वाघाने कुठल्याही प्रकारची आक्रमक भूमिका न घेतल्याने माझा व माझ्या पत्नीचा जीव वाचल्याचे सांगून त्यानंतर काही वाटसरूना सुध्दा वाघोबाचे दर्शन झाल्याची चर्चा असून त्या घटनेबाबत वनविभागाला माहिती आहे किंवा नाही. माहिती असेल तर त्यावर उपाययोजना करून काही मार्ग काढावा व परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, रस्त्याच्या कडेला वाघ असल्याचा फलक लावण्यात यावा व भविष्यात जिवितहानी होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तुळशीराम वडते यांचे मोठे बंधू व खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांना या प्रकरणांची माहिती झाल्यानंतर त्यांनी तुळशीराम वडते यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली अशी माहिती खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...