वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड राळेगाव तालुका प्रतिनिधी: प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती इंदिरा नगर व आदर्श मंडळ राळेगाव चे वतीने आयोजित भव्य शोभायात्रेचा शुभारंभ दुर्गा माता मंदिर येथून झाला. यावेळी प्रभू श्रीराम व माता दुर्गा यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.कमरुनीस्सा हमीदभाई पठाण नगरसेविका, सौ. पुष्पा विजय किन्नाके नगरसेविका, कुंदनभाऊ कांबळे नगरसेवक, मोहन पाटील उपपोलिस निरिक्षक, गंगाधरराव घोटेकार प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ, सैय्यद युसुफअली स्वछता दूत सह मान्यवरांनी केले.
शोभायात्रा दरम्यान इंदिरा नगर व गांधी लेआऊट मधील लोकांनी शोभायात्रेत सहभागी राम भक्तांना पाणी व शरबत चे वाटप केले.
या शोभयात्रेचे मुख्य आकर्षण प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि पवनपुत्र हनुमान यांचे साक्षात दर्शन नागरिकांना झाले ते प्रभू श्रीराम यांच्या वेशभूषेत कु. जानवी दिलीप लांभाडे, माता सीता म्हणून सुहानी दिलीप लांभाडे, लक्ष्मण म्हणून मित दिलीप लांभाडे आणि पवनपुत्र हनुमान म्हणून दर्शिल मनोज भोयर यांच्या सुंदर अश्या भावमुद्रा आणि परिधानाने, भजन दिंडीने आणि बँड च्या तालावर "जय श्रीराम" च्या गजर करून नाचत आनंद साजरा करणाऱ्या युवक, महिला व बालगोपाल.
शोभायात्रा मार्गावर इंदिरा नगर व गांधी लेआऊट मधील माता भगिनींनी सुंदर व आकर्षक अश्या रांगोळी आपापल्या घरासमोर काढल्या होत्या. या शोभायात्रेमध्ये महिला पुरुष व बालगोपाल व युवकांनी सहभाग नोंदवला हे विशेष.
ही शोभायात्रा इंदिरा नगर मधून निघून गांधी लेआऊट येथील मुख्य मार्गाने जाऊन हनुमान मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. आयोजकांनी उपस्थित व शोभायात्रेकरिता सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी शोभायात्रा शांततेत पार पाडावी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...