आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): संपुर्ण देशात ‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ हे अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने जिल्ह्यात जेव्हाजेव्हा पाऊस पडेल त्या प्रत्येक वेळी पावसाचे पाणी जमीनीत साठवता यावे यासाठी नियोजनपुर्वक उपययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज यंत्रणेला दिल्या असून सर्व नागरिकांनी जलशक्ती अभियानात सहभागी होऊन या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन केले आहे.
जल शक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज महसूल भवन येथे आज घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुडधे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संगीता राठोड, जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रदिप कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी नरेगामधून जलसंधारण, वृक्षरोपण व शोष खड्डे घेण्याचे तसेच सर्व शासकीय इमारती, अंगणवाडी व शाळेत रेन वॉटर हार्वेस्टींग व वृक्षारोपण करण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्याचे व विद्यार्थ्यांना जलशपथ देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व नगरपालीकांनी वृक्षारोपण करण्याचे तसेच नगरपालीका क्षेत्रात बांधकामाची परवानगी देतांना रेन वाटर हार्वेस्टींग करण्यात येत असल्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
या अभियान कालावधीत जलसंधारणाची कामे करण्यात येणार असून पेसा क्षेत्र वगळता इतर सर्व ग्रामपचायतीमध्ये 5 एप्रिल रोजी ग्रामसभा ठेवण्यात आली आहे. त्यात गावातील जलसंधारण कामाचा संरचानात्मक आराखडा मंजूरीसाठी ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. वन विभागाने सर्व विभागांत वृक्षरोपण करण्याचे तसेच शासकीय जमीनीवर गैरसरकारी संस्थांच्या मदतीने (एन.जी.ओ.) घनवन लागवड करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
जलसंधारण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर ‘कॅच द रेन’ अभियानाचे उद्धाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या 29 मार्च रोजी करण्यात आले होते. याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी 28 मार्च रोजी बैठक घेवून सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. हे अभियान 22 मार्च जलदिनापासून सुरू झाले असून सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे कार्यालयात जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड यांनी सादर केली.
बैठकीला पाटबंधारे प्रकल्प, जनसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इत्यादी विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...