आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
*केंद्रातील भाजप सरकारच्या दरवाढी,महागाईच्या निषेधार्थ*
*मारेगाव येथे दुचाकी व गॅस सिलेंडर ला हार घालून काँग्रेस पक्षा तर्फे निषेध करण्यात आला*
*************************
*जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा ईशारा*
मारेगाव:- केंद्र सरकार ने जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल,डिझेल,गॅस तेलाची अचानक दरवाढ केल्याने,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या नेत्या सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतुन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष वजाहत मिर्जा यांचे सूचनेनुसार माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे नेते नरेंद्र पाटील ठाकरे व सौ. अरुणाताई खंडाळकर यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका काँग्रेस कमेठीच्या वतीने दुचाकी व गॅस सिलेंडरला हार घालुन निदर्शने करत भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
केंद्रातील भाजप सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल,डिझेल,गॅस,तेलाचे भाव वाढवून गगनाला भीडवले आहे.केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंचे दरवाढ करुन देशातील नागरिकांचे अक्षरशः बेहाल करून जीवन जगणे कठीण केले आहे.या सरकारला जनतेचे काही घेणे देने नसून खोटे बोलून सत्ता हस्तगत करणे, केवळ हाच उद्देश भाजप सरकारचा असल्याचा आरोप ही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेस कमेठीने केला आहे.
पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करणे ही कठीण झाले. तसेच घरगुती गॅस तेलाचे भाव वाढल्यामूळे माता भगिनींना संसार चालविनेही आता कठीण झाले.केंद्र सरकारने त्वरित या जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करावे न केल्यास काँग्रेस कमेठीच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही तालुका काँग्रेस कमेठीच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
यावेळी कृ.उ.बा.स.मारेगाव चे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे,जि. प.सदस्या सौ.अरुणाताई खंडाळकर,जेष्ठ नेते शकील अहेमद शकील कुरेशी,कृ. उ.बा. स.चे उपसभापती वसंतराव आसुटकर,जिल्हा सरचिटणीस रमण डोये,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,शहर अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शंकरराव मडावी,वसंत जिनिंग चे संचालक उदय रायपुरे,सरपंच तुळशीराम कुमरे,उपसरपंच प्रफुल विखनकर आदी काँग्रेस कमेठीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...