वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत २७ मार्च ते २ एप्रील या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबीराचा लाभ घेवून तृतीयपंथीयांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.
तसेच, २१ वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तिच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली होती.
जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तहसिल कार्यालयातील शिबीरासोबतच जिल्ह्यामध्ये ज्या भागात तृतीय पंथीयांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजीत केली जाणार आहे.
तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तिंनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...