Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / जिल्हा परिषद व पंचायत...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर त्यामुळे नेत्यांना आंदोलने, मोर्चे, निवेदनाचा विसर.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर त्यामुळे नेत्यांना आंदोलने, मोर्चे, निवेदनाचा विसर.
ads images

ता प्र : झरी तालुक्यात सध्या राजकीय वर्तुळात नेते पुढार्यांचे मोर्चे, आंदोलन, निवेदने या गोष्टीला विराम मिळाला की काय असे चित्र आहे. आज पर्यंतचा इतिहास आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन  मोर्चे, आंदोलन, निवेदनाचे प्रकार राजकीय नेते पुढारी यांच्या माध्यमातून दिसायचे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्या त्याचमुळे राजकीय वर्तुळात कसल्याही प्रकारची हालचाली नसल्याचे पहायला मिळत आहे. सामान्य जनता साधी भोळी आहे. बर्याच राजकीय विषयापासून अनभीज्ञ राहते. नेमका अशाच गोष्टीचा फायदा राजकीय पुढारी घेतात. निवडणुकीच्या काळात मोठे नेते गावपूढार्यांच्या संपर्कात राहून चर्चा करतात. बर्याच वेळा डोळ्यासमोर निवडनुका असल्या की न होणारे काम फटक्यात होतात.

 तेव्हा शासकीय काम करावयाचे झाल्यास फक्त पुढार्यांचा एक फोन काफी आहे. अन्यथा त्याच शासकीय कामासाठी चक्कर पे चक्कर. सामान्य माणसाला खरंच न्याय मिळणार का. तालुक्यातील सामान्य व्यक्तीला न्यय मिळावे या करीता पत्रकार बंधु नेहमी त्यांच्या कामांकडे व शासनाच्या कामाकडे, कार्याकडे, उदासीन धोरणांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. कारण वृत्तपत्रातून सोशल मीडिया पोर्टल च्या माध्यमातून फार मोठमोठे बदल झाले आणी याहीपुढे होणार. यात काही शंका नाही. याबद्दल सामान्य व्यक्तीलाही कळायला लागलं हे फार महत्वाचे आहे. 

 काही गावगाळ्यात निवडूनका समोर असल्या की पुढारी कामा पुरता मामा जोडतात. रस्त्यात गरीब सामान्य माणसालाही राम राम , नमस्कार करून महत्व देतात. अन्यथा काही पुढारी ओळखत नाही. या गोष्टी गरीब सामान्य व्यक्तींनी ओळखल्या पाहिजेत. शहरासाठी, खेडेगावासाठी, समाजकल्याण करीता झटणाऱ्या व क्षेत्रासाठी चांगले काम करणार्या पुढार्यांच्या कौशल्याची स्तुती कौतुक करायला हवे. परंतु अशे पुढारी बोटावर मोजन्याईतकेच दिसतात हे दूरदैवच म्हणावे लागेल. काही गावपूढारी अशेही असतात की ईतर दूसर्या पक्षाचे उद्घाटनाच्या  आरत्या श्रेयासाठी हातात घेतात. त्यांना गावाबद्दल काहीच अभीमान नसतात. फक्त फूकटच श्रेय कस घेता येईल यावर लक्ष ठेवतात. स्वता काही गावासाठी कामे आणन्याचा प्रयत्न करत नाही. दूसर्याच्या कामावर डोळा ठेवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात. श्रेयासाठी मी पना दाखवतात. अशा नेते पुढार्यांपासून सावधान असायला हवे. यांना ग्रामीण भागातील लोकांनी ओळखले पाहिजे. अनेक बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित केल्या जाते की प्रत्येक क्षेत्रात सुधारणा व्हावी. गरीब सामान्य व्यक्तींना जागरूक करण्यासाठी. याही गोष्टीची पडताळणी करणे आवश्यक आहे. सांगण्याच तात्पर्य श्रीमंतीतून बुध्दी प्राप्त होत नाही उलट बूध्दीतून श्रीमंती प्राप्त होते. हे तितकेच खरे आहे. यासाठी शिक्षणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. शिक्षा जवळ असली की दिशाभूल करणारेही घाबरतात. म्हणून सुशिक्षित चांगला नेता जो समाज कल्याण कार्य करणारा, क्षेत्राची जाणीव असणारा, मानुसकीची जाण असते, गरीब सामान्य व्यक्तींना जोपासणारा अशांना महत्व द्या. 

तेव्हाच काहीतरी बदल पाहायला मिळणार. मानुसकीलाही महत्व येणार. पैशा पेक्षा बुध्दी श्रेष्ठ ही गोष्ट सर्वसामान्य व्यक्तीने समजने महत्वाचे आहे. तरच समाजाचा, गावाचा, तालूक्याचा प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. जेव्हा गरीब सामान्य व्यक्ती विकासावर समाधानी होणार नाही तो पर्यंत विकास झाला असे म्हणता येणार नाही. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून ईतके वर्षे वाया गेली आतातरी चांगल्या व दिशाभूल करणार्या नेत्यांना ओळखा. निवडणुका जवळ असल्या का आणि लांबणीवर असल्या का फरक पडणार नाही अशा गोष्टींना महत्त्व द्या. आणि आपल्या क्षेत्राचा विकास करा.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...