Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यातील पोलिस...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यातील पोलिस कर्मचारी नक्षल भत्तापासून वंचित.

झरी तालुक्यातील पोलिस कर्मचारी नक्षल भत्तापासून वंचित.
ads images

झरी :- शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्याला नक्षलग्रस्त तालुका म्हणून २०१७ मध्ये घोषित करण्यात आले. नक्षलग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व इतर विभाग असून यातील बहुतांश विभागाना नक्षल भत्ता लागू करण्यात आला आहे. झरी तालुका हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.

तालुक्यात पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, न्यायालय, शासकीय दवाखाना, ट्रेजरी, भूमी अभिलेख कार्यालय, निबंधक कार्यालय, स्कूल, कॉलेज, शिक्षण विभाग, कृषी कार्यालय, आश्रम शाळा, बांधकाम विभाग बँक व इतर कार्यालय असून यात शेकडो अधिकार व कर्मचारी काम करतात. या सर्व कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांना शासनाने लागु केलेले नक्षल भत्ता मिळत आहे, तालुक्यात मुकुटबन व पाटण दोन पोलीस स्टेशन येत असून दोन्ही ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना नक्षल भत्ता अजूनपर्यंत मिळाला नसल्याने कर्मचाऱ्याच्या प्रचंड नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नक्षल भत्ता मिळत असून कर्मचाऱ्यांना का नाही असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. अधिकारी यांना नक्षल भत्ता मिळत असतांना कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने असा दुजाभाव का होत आहे, असा प्रश्न पोलीस कर्मचारी करीत आहे.

सण २०१७ पासून पोलीस अधिकारी नक्षल भत्ता उचलत आहे परंतु कर्मचाऱ्यांवरच असा अन्याय का केल्या जात आहे. पोलीस कर्मचारी कोणतेही सण असो किंवा इतर बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी २४ तास ड्युटी करीत असतात. उन्हाळा असो की पावसाळा जनतेच्या सुरक्षेसाठी निस्वार्थ सेवा करताना दिसतात अश्या कर्मचाऱ्यांचा नक्षल भत्ता न दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यात प्रचंड नाराजी दिसून पडत आहे. नक्षलग्रस्त तालुका घोषित केल्यानंतर इतर सर्वच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षल भत्ता मिळत असतांना गेल्या ५ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांना नक्षल भत्यापासून वंचित ठेवण्याचे कारण कळू शकले नाही. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून पोलीस कर्मचाऱ्यांचे थांबलेले नक्षल भत्ता त्वरित काढून द्यावे अशी मागणी पोलीस वर्तुळातून केली जात आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...