Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / श्री.धनराजभाऊ चिंधुजी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष, पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा

श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष, पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): श्री.धनराजभाऊ चिंधुजी पुरके अध्यक्ष ,पितृछाया शिक्षण संस्था आटमुर्डी ,यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळा कृतज्ञतेचा आणि निमंत्रितांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी तळेगाव ( भारी) येथील कासाबाई चिंधुजी पुरके सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.डाॅ.श्री.रमाकांतजी कोलते सर कार्याध्यक्ष ,९२ वे अ.भा.साहित्य संमेलन हे होते.स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके साहेब,प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ सौ.माधुरीताई मडावी , जिल्हाध्यक्ष अंकुर साहित्य संघ यवतमाळ सौ.विद्याताई खडसे,श्री पुरुषोत्तमजी ओंकार सर ,माजी शिक्षणाधिकारी श्री अशोकराव आठवले , साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते माजी गटशिक्षणाधिकारी श्री.उत्तमराव गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके,माजी शिक्षणाधिकारी अशोकजी आठवले , पुरुषोत्तमजी ओंकार सर यांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले .आपले अध्यक्षीय विचार रमाकांतजी कोलते सर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी गटशिक्षणाधिकारी उत्तमराव गेडाम यांनी केले .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरविंदजी मडावी यांनी केले.दुसरे सत्र कविसंमेलन निमंत्रितांचे..या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्रा.माधवराव सरकुंडे हे होते.

या मध्ये कवि विनयजी मिरासे, सुप्रसिद्ध गझलकार किरणकुमार मडावी, सुप्रसिद्ध कवी ,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ,अकोला अनंतजी राऊत , सुप्रसिद्ध कवी यवतमाळ जयंतजी चावरे , सुप्रसिद्ध कवयित्री, अमरावती सौ.अलका तालणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कवि अनंतजी राऊत यांची दुःख अडवायला उंबऱ्यासारखा...मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा....आणि अंधाराच्या छाताड्यावर ठिणग्या पेरत जावे. आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे आणि सौ.अलका तालणकर यांनी सादर केलेल्या मन झुरलं..
मन झुरलं....बालपण सुखातलं..कसं फिरे भोवताली..खेळ भांडे सण भात..आहे रिकामीच खोली ..दे लहानपण देवा .. नाही मनच भरल...याद येते माहेराची ..मन झुरलं.....आणि धर्म नाही,पंथ नाही,एक ऐसे गाव दे...माणसाला फक्त आता माणसाचे नांव दे...पेटते ज्वाला चितेची..रोज फाशी घेऊनी..

जीव कवडीमोल झाला...तो क्षणाला भाव दे..माणसाला फक्त आता माणसाचे नांव दे..व इतरही कविंनी आपल्या अप्रतिम आवाज आणि दमदार सादरीकरण करत ,एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळविली . शब्दलंकारांनी भरलेली ही मैफल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली.

या कार्यक्रमात प्रा.श्री.रमाकांतजी कोलते,माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतरावजी पुरके,श्री.अशोकराव आठवले ,श्री. उत्तमराव गेडाम,श्री. पुरुषोत्तमजी ओंकार,श्री.नरेन्द्रजी मानकर,श्री विलासजी राठोड,प्रा.श्री.मेनकुदळे,सौ.विद्याताई खडसे,सौ.पुष्पाताई नागपूरे, सौ.जयाताई पोटे,सौ.स्वातीताई येंडे,श्री.राजुभाऊ पोटे ,श्री.मोहनजी बनकर,श्री राजुभाऊ पांडे, श्री.वासुदेवराव मोतीकर,श्री जिनेन्द्रजी ब्राह्मणकर, श्री नितीनजी पखाले,श्री.सुरेशजी कनाके,श्री.पवनकुमार आत्राम,श्री .गुलाबजी कुडमथे,श्री.श्रीमंतकुमार गेडाम,देशपांडे सर, धर्माधिकारी सर,गजघाटे सर,नांदणी या सह अनेक सर,भोंगाडे सर,धुमाळ सर,सिडाम सर,शिंदे सर ,प्रशांतजी कुसराम यासह इतर गणमान्य बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्या गोष्टी विषयी आदर मनात असल्यास तो कृतीत सहज उतरतो असे म्हणतात त्याच वृत्तीने या कवि संमेलनाचे सुत्र संचालन किरणकुमार मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी शिक्षणमंत्री प्रा वसंतरावजी पुरके यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...