वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी):;राळेगाव तालुक्यातील दिनांक २० मार्च रविवार रोजी वरध तालुका राळेगाव येथे बीरसा ब्रिगेड शाखा उद्घाटन व समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे बिरसा ब्रिगेड कार्याध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांनी कार्यक्रमाचे सूर्वातीला बिरसा मुंडा व बाबुराव शेडमाके यांच्या तैल चित्राचे अनावरण करून, गावात भव्य मिरवणूक काढून,आदिवासी क्रांतिकारक यांचा जयघोष केला.त्यानंतर जनते समोर मार्गदर्शन करतांना सांगितले,शिक्षण मत्वाचे आहे, शिक्षणातून आपली उपजिविकेची साधन निर्माण करता येतं.म्हणून जीवनात शिक्षण मत्वाचे आहे.
परिस्थिती मुळे मुलगा शिकत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा त्याची व्यवस्था आम्ही करू.आज जी दारिद्र्य अवस्था आली याचे कारण आपण निवडून पाठवली मुकी बहेरी आंधळे प्रतिनिधी आहे, क्रांतिवीरानचा ते इतिहास वाचीत नाही.मूठभर चिवडा घुटभर दारू ,मटन चारून आपली मते विकत घेतात,यासाठी आपणही दोषी अlहो.हे समजून घेतले पाहिजे.समाजातील समाजाच्या हिताचा युवा पिढीतील आपला प्रतिनिधी निवडून पाठविला पाहिजे असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. वसंतराव कनाके हे होते.
त्यांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके , बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम यांचा स्वातंत्र्य लढ्यातील उठावाचा पूर्ण इतिहास सांगितला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना कु. कांचन मेश्राम माजी सरपंच यांनी मांडले,याठिकाणी राळेगाव तालुका अध्यक्ष दिनेश करपते यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रम अंती बिरसा ब्रिगेड वरध गाव शाखेचे अध्यक्ष म्हणून रतन मांगर्ले यांची निवड करून त्यांना अधिकार पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सोबत महिला अध्यक्ष कांचन मेश्राम ,शाखा सचिव सारंग कनाके, सचिव प्रदीप कुंबरे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर मेश्राम पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांनाही अधिकार पत्र देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव विभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोले, प्राध्यापक श्रीकांत जुमनाके, विद्यार्थी जिल्हा बीरसा ब्रिगेड कार्याध्यक्ष विकास उईके, सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके, जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी, राळेगाव तालुका कार्याध्यक्ष आदर्श मडावी , राळेगाव संघटक महादेव मेश्राम, कळंब तालुका संघटक प्रमोद इरपाते , सुमित आत्राम आदी उपस्थित होते.
रतन मांगर्ले यांनी पाहुण्यांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विठ्ठलराव गोपतवार ,वंदना गेडाम, कविता टेकाम, पुष्पा कुळसंगे
यांनी प्रयत्न केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...