आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी :- उन्हाळ्यात झाडांना खुप महत्व सावलीचे झाडे तर अतिशय आवश्यक आहे. झाडं निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. झाडं कसलीही अपेक्षा न करता आपल्याला नेहमी मदत करतात. झाडं नसली तर, कडकडत्या उन्हात आपल्याला सावली मिळणार नाही. झाडे फळ- फुलं, ऑक्सिजन, सावली देतात. यासाठी झाडांची कींमत फक्त उन्हाळ्यातच नाही तर वर्तमान व भविष्यात सुध्दा आहे
तसे पाहिले, तर या कल्पना करत बसण्याची गरजच नाही. माणूस प्रगतीच्या कितीही वल्गना करो, निसर्ग त्याला सदोदित आपली ताकद दाखवत असतोच. आठवून पाहा - काही वर्षांपूर्वी लातूरला भूकंप झाला, कच्छला भूकंप झाला. हजारो माणसे गाडली गेली. हजारो घरे जमीनदोस्त झाली. असंख्य माणसे कायमची अपंग बनली. रस्ते उखडले गेले. झाडे जमीनदोस्त झाली, रोगराई पसरली. निसर्ग कोपला, तर काय हेच होणार. हा निसर्गाचा कोप आहे. मोठमोठी धरणे बांधून विशिष्ट ठिकाणच्या जमिनीवरचा भार पराकोटीचा वाढला की समतोल नष्ट होतो. जमीन थरथरते. भूकंप होतो. हा निसर्गाचा संतापच आहे.
काही काळापूर्वी आलेली त्सुनामीची लाट ही निसर्ग कोपला तर काय करू शकते, याचे प्रत्यंतर जगाला आलेच आहे. शंभर शंभर फूट उंचीची उभ्या भिंतीसारखी पाण्याची लाट प्रचंड वेगाने जमिनीवर येऊन आदळते, तेव्हा किनाऱ्यालगतची गावेच्या गावे वाहून जातात.माणसाने या संकटाला तोंड देणे सोडाच, पण दूर पळून जाणेही अशक्य बनते कारण भूकंप, त्सुनामी यांच्या पूर्वसूचना मिळवणे अदयापही माणसाला शक्य झालेले नाही. म्हणजे निसर्गापुढे माणूस क्षुद्रच आहे.
झरी तालुका वनक्षेत्र अधिक असल्याने आदिवासी बांधव उन्हाळ्यात खाली दिवसात मोह फुले, डीक, चारू विकने व्यवसाय तसेच काही आदिवासी बंधू थोडीफार शेती कुकूट पालन शेळी मेंढी पशु पालन करून उदरनिर्वाह करीत असते. अनेक आदिवासी आधुनिक मुल छोटे धंदे पानटपरी, सारखे व्यवसायीक करताना दिसून येते. खरं तर आदिवासी भागात फारसा विकास झालेला दिसून येत नाही. त्यामुळे आदिवासी बरेच परीवारला उन्हाळ्यात हाताला काम नसलेले दिवस असल्याचे जाणवते. तालूक्यातील आदिवासी लोक आपल्या परीस्थितीला अनुसरुन खर्च करत असतात. यामुळे आदिवासी लोकं उन्हाळ्यात कमी खर्चात मजेशीर कार्यक्रम साजरे करतात. विषेस म्हणजे आदिवासी लोक साधे आणि सरळ स्वभावाचे असतात. कोणतेही कार्यक्रम असल्यास आदिवासी नृत्याने नाचगाण्याने साजरे करतात.
खेडेगावातील उन्हाळ्याचे दिवस म्हणजे शालेय मुलांना सूट्टीचे दिवस, कर्मचाऱ्यांना पर्यटन दिवस तर शेतकऱ्यांना शेतातील कामाचा दिलासा देणारे दिवस. उन्हाळ्यात एकूण कार्यक्रमाला उत्साह असतात. उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्तीना पाहुणे बनून नातलगांच्या गावाला जाने फार आवडते. लग्न कार्य, वास्तू शांती कार्यक्रम, वाढदिवस कार्यक्रम, ईश्वर शांती कार्यक्रम, मेळावे अशा प्रकारचे ईतरही कार्यक्रमाला उपस्थित राहने म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा विषय. नव नवीन कपडे घालने, सजने सवरने, भेटी गाठी करने,गप्पा गोष्टी करने उन्हाळ्यात अधिक प्राधान्य असते. एखाद्या मार्केट मध्ये गेल्यावर आईस्क्रीम खाने, थंड पेय, रसवंती, मुलांना कुल्फी सारख्या थंड खाण्याची आवड निर्माण होत असते. आणी मजेशीर आपनही थंड खात पीत असतोच. त्या सोबतच लग्न कार्यात नाचगाणी करण्याला व मनसोक्तपणे पहायला खूप मजा येते.
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे कर्मचार्यांना पर्यटन करायला सुगीचे दिवस असतात. आपल्या परीवार सहीत गड, नद्या, झरने, समूद्र थंड हवेच्या ठिकाणी जात असते. आपल्या मुला बाळांना नवनवीन ठीकाने दाखवित असतात. आधुनिक वस्तू खरेदी करतात.
शेतकरी मात्र लग्न समारंभ, जत्रा, मेळावे, नातेवाईकांना भेटण्यासाठी कामे उरकून वेळ काढत असतांना दिसते. भारतीय कृषी क्षेत्राची शान असलेले शेतकरी मार्चमध्ये कामे आटोपतात. जावई, मुलगी, सगे सोयरे धायरे, शेतकरी मुलांना मामा मामी यांना भेटण्याची उत्सुकता असते. अल्पशा पैशात अधिक आनंद घेत असतात. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांना लग्न समारंभ, जत्रा, रात्रीचे किर्तन प्रवचन या गोष्टींना प्राधान्य देतात. सोबतच शहराच्या ठिकाणी जाऊन फीरण्याची फार आवड असते. शेतकरी राजा उन्हाळ्यात जत्रेच्या ठिकाणी परिवारासहीत जातात. थंड पेय, आईस्क्रीम, उसाचा रस पीत असताना दिसते. परीवारातील सदस्यांना कपडे, मुलांना खेळनी, खेळाच्या बैलगाड्या, बैल बाजार फीरने अशा गोष्टींना प्राधान्य देताना दिसत असते. शेतकरी परीवार उन्हाळ्यात गावभोजनाचे कार्यक्रम करीत असतात. शेतकरी दानधर्म करण्यास कधीच मागेपुढे पाहत नाही. हे त्याच्या स्वभाविक गुनांवरून दिसून येते. रात्रीच्या वेळी शेतकरी आजोबा आपल्या नातू ,लाहान मूलांना कहानी आवर्जून सांगतात. शेतकर्यांचे शहराच्या ठिकाणी असलेले नातलन उन्हाळ्याच्या दिवसांत खेडेगावात आवर्जून भेटण्यास येतात. भेटीगाठी मध्ये उत्साह, आनंद त्याचबरोबर शहरी नातलगांना खेडेगावातील दुर्मीळ वस्तू, ठिकाणे दाखविण्याची उत्सुकता शेतकर्यांमध्ये पहायला मिळतात.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...