Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *विदयूत मंडळाने शेतक-यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*विदयूत मंडळाने शेतक-यांना 24 तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा. :अ.भा.ग्राहक पंचायतचे गजानन पांडे यांची मागणी*

  *विदयूत मंडळाने शेतक-यांना 24 तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा. :अ.भा.ग्राहक पंचायतचे गजानन पांडे यांची मागणी*

                           

.

 

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

.

      शेतामध्ये कृषी पंपाकरीता व अन्य शेतीच्या कामाकरीता रेग्यूलर विज पुरवठा नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे तेव्हा विदयूत मंडळाने शेतक-यांना 24 तास अखंडीत विजेचा पुरवठा करावा अशी आग्रहाची मागणी 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्याने अ.भा.ग्राहक पंचायत महाराष्ट्र व गोवा राज्याचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केली आहे .

    श्री पांडे पुढे म्हणाले की, विदयूत मंडळ कुठल्याही उदयोगाला 24 तास अखंडीत विजेचा पुरवठा करते, परंतु शेतक-यांना आठवडयातून तीन दिवस दिवसा तीन-चार तास व चार दिवस रात्री चार-पाच तास विजेचा पुरवठा करते तो ही खंडीत केलेला.हा सरकारचा भेदभाव करणे असून शेतक-यांवर वारंवार अन्याय करणारे आहे. जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत-मजदुरी करुन अन्यधान्य पिकवितो त्यांचेवर सतत अन्याय केल्या जातो व उदयोगधंदेवाल्यांसमोर लाल कारपेट अंथरले जाते  हा भेदभाव कां ? असा सवालही ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे.

     उदयोगधंदेवाल्यांकडे लाखो रुपये थकीत असतांना त्यांचेवर मेहेरबाणी केली जाते, परंतु गरिब शेतक-यांकडे हजार रुपयांची  जरी  थकबाकी असेल तर त्यांची लगेच वीज  कापल्या  जाते  व त्यांना रस्त्यांवर आणल्या जाते. त्या गरीब शेतक-यांना रस्त्यांवर उतरुन आंदोलन करावे लागते याकडे  लक्ष वेधून हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही अ.भा. ग्राहक पंचायतने दिला आहे.

     या मोठया उदयोगधंदेवाल्यांकडे असलेल्या लाखोंच्या थकबाकी बाबत अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर यांनी एक जनहित याचिका दाखल केली होती व थकबाकी वसूल करण्याबाबत विदयूत मंडळाला एकप्रकारे  मदत केली होती याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधले आहे.

    शेतक-यांना  ब-याच सरकारी योजनांवर सरकारी अनुदान दिल्या जाते. तर 80-90 टक्के अनुदान दिल्याची प्रसिध्दी केल्या जाते  परंतु प्रत्यक्षात 50 टक्केच अनुदान शेतक-यांच्या खाती जमा होते याकडेही ग्राहक पंचायतने लक्ष वेधून जेवढे अनुदान जाहीर केले जाते ते 100 टक्के  अनुदानाची रक्कम  शेतक-यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणीही गजानन पांडे यांनी केली आहे.

     शेतक-यांचे निसर्गामुळे वारंवार होणारे पिकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे वारंवार होणारे पिकांचे, फळांचे नुकसानीबाबत   महाराष्ट्र सरकारतर्फे  नुकसान भरपाईबाबत बांधावर येवून फक्त घोषणा केल्या जातात परंतु प्रत्यक्षात शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही ही शोकांतिका असून याकडेही लक्ष वेधून केलेल्या घोषणांची प्रत्यक्षात 100 टक्के अंमलबजावणी करुन शेतक-यांना न्याय मिळवून दयावा अशी मागणीही अ.भा.ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे  या पत्रकाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...