आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: तालुक्यात कोरोना काळात गरीबांना रेशनकार्ड वरदान ठरले. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मोलमजुरी करणार्यांना जर रेशनकार्ड सुविधा नसती तर खरोखर मेटाकुटीस आले असते. ऐन वेळी कोरोना काळात केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप निर्णय सामान्य गरीबांना खुप मोलाचा ठरला. खरोखर तो एक निर्णय गरीब सामान्य व्यक्तींना योग्य होता. अनेक लोकांना रेशनकार्ड च्या अडचणी निर्माण होत आहे. बर्याच लोकांना नवीन रेशनकार्ड बनवीण्यासाठी, काहींना रेशनकार्ड वर कुटुंबातील व्यक्तींचे नावे काढण्यासाठी, चढविण्यासाठी, तर काहींना वेगवेगळे कुटुंब असल्याचे दर्शवीण्यासाठी वारंवार चकरा तालूक्याच्या ठिकाणी माराव्या लागतात.
या सर्व अडचणी दूर व्हायला हवे. रेशनकार्ड हे किती महत्वाची गोष्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. रेशन कार्ड आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्यासह त्याचा सर्वात महत्वाचा उपयोग हा कमी मूल्यात धान्य विकत घेण्यासाठी आहे. मात्र अनेकदा अनेक नागरिक याचा लाभ घेत नाहीत. सरकारकडून रेशन कार्डची यादी सतत अपडेट केली जाते. अशा परिस्थितीत ज्यांनी रेशन कार्डचा वापर केला नसेल त्यांचे कार्ड रद्द करण्यात येऊ शकते.
मागील काही वर्षांपासून रेशन कार्डद्वारे धान्य घेण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे. त्यासह ग्राहकांनी रेशन कार्डचा वापर करून धान्य घेतले आहे की, नाही याचा आता ऑनलाईन पुरावा सरकारकडे जात आहे. मागील काही काळात रेशन कार्डचा वापर बराच काळ न केल्यामुळे अनेकांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
गरिबांसाठी रेशन कार्ड उपयुक्त. सर्वसामान्य गरीब लोकांसाठी रेशन कार्ड हे अतिशय फायदेशीर गोष्ट आहे. ज्याद्वारे त्यांना अगदी कमी किमतीत धान्य मिळते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कुटुंबातील सदस्यसंख्या लक्षात घेऊन प्रत्येकी व्यक्तीस अन्नधान्य दिले जाते. ज्याचा अर्थिक फायदा गरजू नागरिकांना होतो.
जर एखाद्या व्यक्तीने 6 महिने रेशन कार्ड वापरून धान्य खरेदी केले नाही, तर तो ग्राहक या सवलतीसाठी अपात्र ठरतो. कारण त्या व्यक्तीला कमी मूल्यात मिळणाऱ्या धान्याची गरज नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे सदर व्यक्तीचे रेशन कार्ड रद्द केले जाते. तालूक्यातील नागरीकांनी या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण गरीब सामान्य व्यक्तींना रेशनकार्ड योजना वरदानच. यासाठी रेशनकार्ड कोणाचेही बंद होता कामा नये , याची तालुक्यातील नागरीकांनी काळजी घ्यावी. जनहितार्थ जारी
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...