वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे आज रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वार्धक्यामुळे निधन झाले. सुमित्राबाई यांनी वयाच्या 102 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
दारव्हा तालुक्यातील हरू या गावातील सुमित्राबाई ठाकरे यांनी पुत्र माणिकराव ठाकरे यांच्या आयुष्याला खरे वळण दिले. कणखर भूमिका, स्वभावातील बाणेदारपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला होता. शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. वार्धक्य अवस्थेतही त्या शेतात नित्याने जायच्या.
गावात त्यांचा आदरपूर्वक दरारा होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी गावाशी आपली ‘नाळ’ जोडून ठेवली होती. मुलगा माणिकराव ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रात नवनवी यशाची शिखरे पादाक्रांत केल्यानंतरही त्यांनी कधीच जगण्यातला साधेपणा सोडला नव्हता. अनेकवर्ष माणिकराव ठाकरे यांचेकडे मंत्रिपद, पक्ष संघटनेत प्रदेशाध्यक्षपदासारखी धुरा, विधानपरिषदेचे उपसभापतिपद असतानाही त्यांचा गावातील लोकांसोबत असलेला जिव्हाळा कायम होता. राजकारणातील व्यस्ततेतूनही माणिकराव ठाकरे आपल्या आईच्या सेवेत रमायचे. अलीकडे वृद्धापकाळामुळे त्या कुटुंबातच रमल्या होत्या. वयाची नाबाद शंभरी पार केल्यानंतर गत दोन वर्षांपासून त्या पूर्णत: थकल्या होत्या.
आज रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी यवतमाळातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पुत्र माणिकराव ठाकरेंसह तीन मुली, जावई, नातू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, अतुल ठाकरे अशा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
------ ------
हरू या मूळगावी होणार अंत्यसंस्कार
माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांनी कायम आपल्या हरू या गावाशी नाते जपले. त्यामुळे हरूमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सोमवारी 21 मार्चला सकाळी 10 वाजता हरू येथील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...