Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / ग्रामीण पत्रकारांची...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

ग्रामीण पत्रकारांची कामगिरी कौतुकास्पद -आ. बोदकुरवार.

ग्रामीण पत्रकारांची कामगिरी कौतुकास्पद -आ. बोदकुरवार.

दिलदार शेख (ता.प्र/मारेगाव) : विविध उपक्रम राबवून सामाजिक दायित्व निभावण्याचे काम ग्रामीण पत्रकार संघाने केले आहे. वृत्तलिखानासह त्यांनी केलेली सर्वच सामाजिक कामे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हास्य कल्लोळ या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख होते. तर प्रमुख अतिथि म्हणून ग्रामीण पत्रकार संघचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके इंदिरा सुतगीरनिचे अध्यक्ष सुनील कातकडे,लोढ़ा मल्टी स्पेशलिष्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ. महेन्द्र लोढ़ा, पत्रकार संघचे जिल्हाउपाध्यक्ष जोतिबा पोटे मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की तहसीलदार दीपक पूंडे, ठानेदार राजेश पूरी, कांग्रेस चे नेते गजानन कीन्हेकर, ग्रामीण पत्रकार संघचे तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, ठीकरे मडम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.ते बोलताना पुढे म्हणाले की, ग्रामीण पत्रकारासाठी मारेगाव शहरात पत्रकार भवन आवश्यक आहे आणि त्यासाठी मी आमदार या नात्याने प्रयत्न करणार असून पत्रकार भवनसाठी लागणारा निधि उपलब्ध करुन दिला जाईल. दरवर्षी मारेगावात ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने रंगपचमीच्या शुभपर्वावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याही वर्षी हास्य कल्लोळ हा विनोदी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हास्य कलावंत झी मराठी मधील चला हवा येवू द्या फेमचे प्रवीण तिखे, मराठी पाउल पडते पुढे फेमचे एजाज खान, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हास्य कालावंत प्रा. हेमंत चौधरी, पुरुषोत्तम गावंडे, साहिल दरणे, यांनी रसीकाना पोटभर हसवीले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी, पत्रकार संघचे जिल्हाउपाध्यक्ष जोतिबा पोटे तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, सचिव नागेश रायपुरे, कार्यध्यक्ष देवेंद्र पोल्हे, भास्कर धानफुले,अशोक कोरडे,रमेश झीगरे, श्रीधर सिडाम, उमर शरीफ, सुरेश नाखले,दिलदार शेख आदिनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी. 23 January, 2025

मुंगोली येथील नागरिकांना पुनर्वसण ठिकाणी प्लॉट वाटप करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- तालुक्यातील मुंगोली गावातील सर्व जमीन वेकोलीने अधिग्रहण केली. जमिनीसह गावाचे पुनर्वसन करणे हे विकोलीच्या प्रस्तावात...

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत 23 January, 2025

हिंदरत्न मनस्वीचे मनसेने वणीत केले जंगी स्वागत

वणी: बोटोनी सारख्या ग्रामीण भागातून येऊन कमी वयात स्केटिंग गोल्ड मेडलिस्ट ठरलेली मनस्वीने आज "३० की.मी. स्केटिंग फॉर...

*निधन वार्ता* 23 January, 2025

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था  तात्काळ करा. 23 January, 2025

ग्रामीण रुग्णालय वणी व ट्रामाकेअर युनिट यांची जोडणी करून रक्त साठा युनिटची व्यवस्था तात्काळ करा.

वणी:-ग्रामीण रुग्णालय वणी येथील ट्रॉमा केअर युनिट हे ग्रामीण रुग्णालयापासून अलग असल्याने ते रूग्णांकरिता सुविधा...

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* 22 January, 2025

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन*

*भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतीं यांना भारतीय जवानांना न्याय देण्यास निवेदन* ✍️मुनिश्वर...

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार  किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* 22 January, 2025

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त*

*मोटार सायकल चोर गजाआड १लाख २५ हजार किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त* ✍️ गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-शहरात...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...