वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: शहरातील नवतरुण क्रिडा मंडळ वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खुल्या मैदानात खुले भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन चंद्रपूर आर्णी मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सुरेश(बाळू भाऊ) धानोरकर यांच्या हस्ते दि. 11 मार्च रोजी भव्य कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन सोहळा पार पडला होता.
कबड्डी स्पर्धेचा दुसरा टप्पा म्हणजे बक्षीस वितरण काही दिवसापासून मारेगाव येथे खासदार चषक 2022 या स्पर्धेला सुरुवात झाली. सतत सहा दिवसापासून दिवस रात्र चालत असलेल्या या स्पर्धेचे समारोप दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस टी. एस.ओ.वणी संघाने पटकाविले . तर द्वितीय पारितोषिक जय हिंद संघ, यवतमाळ, तृतीय पारितोषिक जय दुर्गामाता संघ परसोडी, तर चतुर्थ पारितोषिक जय हिंद संघ मारेगाव यांनी पटकाविले .
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गौरी खुराणा हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे हे होते. यावेळी बक्षीस वितरण रवींद्र पोटे, रवि धानोरकर, नगरसेवक नंदेश्चर आसुटकर, शेख युसुफ, नगरसेवक हेमंत नरांजे, नगरसेवक अनिल गेडाम, रफिक शेख व मंचावरच्या पाहुण्यांच्या उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रथम विजेता संघाला खासदार ट्राफि देण्यात आली.
यावेळी नवतरुण क्रिडा मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले या मध्ये रफिक शेख, समिर कुळमेथे, शुभम, राँयल सय्यद,बोबडे, गौरव थोरात, आकाश सोयाम, विजय ठावरी, सलाम पठाण, मनोज टेकाम, प्रफुल्ल उरकुडे, अभि, चालाख, सचिन तुमराम, मारोती परचाके, मारोती दुधकोहळे, कौतुक खंडाळकर, आकाश कोयचाडे, अजय कोयचाडे, महेश नागेश, रितीक वांढरे यांनी सहकार्य केले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...