Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / बोरी (गदाजी) येथे उद्या...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

बोरी (गदाजी) येथे उद्या होणार अद्भुत , भव्य दिव्य गोटमार

बोरी (गदाजी) येथे उद्या होणार अद्भुत , भव्य दिव्य गोटमार

श्री संत गदाजी महाराज यांच्या कृपेने भरविली जाते गोटमार यात्रा

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): मारेगाव: तालुक्‍यातील बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी अद्भुत अशा भव्य दिव्य गोटमारीचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहेत. उद्या शुक्रवार दिनांक 18 मार्च 2022 ला सकाळी 11 वाजता अनेक वर्षांची परंपरा लाभलेला गोटमारिचा खेळ खेळला जाणार आज. यात्रा महोत्सव १८ मार्च पासून सुरू होत असुन ही अनेक पासुन परंपरा आजतागायत सुरू आहे. बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुनची परंपरा असुन राज्यासह परराज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. 

गावा शेजारून वाहणार्‍या छोट्या नदीच्या काठावर श्री संत गदाजी
महाराज यांचे मंदिर असून होलिका पर्वावर येथे तीन दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

१२ मार्चला घटस्थापणा झाली असून १८मार्च रोजी सकाळी गोटमार व नंतर काला, २१ मार्च रोजी पाखड पुजा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बोरी या गावाला गोटमारी मुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता गावकरी हुतुतु हा परंपरागत खेळ खेळतात. या खेळात शेवटी बाद होणाऱ्या व्यक्तीची जिवंत प्रेतयात्रा काढली जाते. याला मढ असे गावकरी संबोधितात. हे मढ संपूर्ण गावात बँड वाज्याच्या तालात फिरविले जाते. नंतर गोटमारीच्या खेळाला सुरुवात होते.

हा खेळ जो पर्यत एका होळकराला लागून तो होळकर बेशुद्ध पडत नाही तोपर्यंत सुरूच असतो. गोटमार खेळणाऱ्या व्यक्तीला होळकर या नावाने संबोधिले जाते. अशी ही भव्य दिव्य गोटमार यात्रा पाहण्यासाठी भक्तांची मांदियाळी बोरी गदाजी येथे अनुभवायला मिळते. भाविक भक्तांची अलोट गर्दी या वेळी असते.दरम्यान यात्रा आयोजनाची तयारी पुर्ण झाल्याची माहीती असुन या भाविकांनी दर्शन व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...