आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून कोणीही लाभार्थी डाटा दुरूस्तीच्या कारणास्तव वंचित राहता कामा नये, यासाठी 25 मार्च पासून गावस्तरावर कॅम्पचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांचा डाटा दुरूस्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी या कॅम्पचा लाभ घेवून आपला मोबाईल नंबर, आधार क्रमांक अद्यावत करून व इतर त्रुट्या दुरूस्त करून घ्याव्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित डाटा दुरूस्तीची कार्यवाही मोहिम स्वरूपात राबविण्याबाबत पूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे काल सोमवार दिनांक 14 मार्च ला सभा घेतली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुडधे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना मदतीचे हप्ते वितरीत करण्यात येत आहेत. तथापि यात बँक ट्रान्झेक्शन फेल्युअर डाटा, आधार दुरूस्ती, बचत खाते ॲक्टीव नसने, बचत खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी. कोड न जुळणे, आधार कार्ड व अर्जातील नावात फरक येणे इत्यादी त्रुट्या निधी वितरणात येत आहेत.
यासाठी प्रत्येक गावात महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी शेतकरी मित्रांच्या सहकार्याने प्रलंबित डाटा दुरूस्तीची कार्यवाही पुर्ण करण्याचे व लाभार्थ्यांची 100 टक्के भौतिक तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. शेतकऱ्यांनी यावेळी आपले आधार कार्ड, बँक खाते तपशील, चेकबुक, सात-बारा चा उतारा इत्यादी कागदपत्रे सोबत आणावी असेही त्यांनी सांगितले. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...