आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: झरी तालुक्यातील महिला बचत गट कर्ज घ्या कर्ज फेडा तर फायदा कुणाचा हे समजन कठीणच. तालुक्यात प्रत्येक लाहान मोठ्या गावात महीला बचत गट आहे. परंतु बर्याच पैकी महीला शेत मजूरी करताना पहायला मिळत आहे.
यामुळे महीला बचत गट नावापुरतेच का असा प्रश्न उपस्थित होते. तर महीला बचत गटाचा उपयोग काय. मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांमध्ये गावोगावच्या महीला बचत गट भरमसाठ संख्येने उपस्थित राहताना दिसतात. महीलांना सभा, कार्यक्रम, पाहण्याच ऐकण्याचा स्वातंत्र्य आहे यात काही शंका नाही. बचत गटांचा भाषणाच्या कार्यक्रमात भरगच्च संख्या दाखवण्यासाठी उपयोग होते की काय अशे वाटायला लागले.
महीला बचत गट गृप तालुक्यात गावोगावी असल्याने नेते मंडळींना सभेची संख्येने उपस्थिती व शोभा वाढवण्या करीता अती ज्यास्त मेहनतीची आवश्यकता राहली नाही काय? म्हणजे महीला बचत गटाचे १०, २० चे गृप असल्याने नेते पुढारी यांना सभा संख्येने भरगच्च होण्यासाठी फायदा झाल्याचे वाटायला लागले. पन महीला बचत गटात पैसै मात्र महीला शेतात मजूरी करून भरताना दिसते. तर महीला बचत गटाचा उपयोग काय. महीला बचत गटाचे उद्योग कीती ठिकाणी आहे. अनेक महीला मीटींग असल्यास मजूरी बूडवून जातात. तर पैसै कमी होतात की वाढतात यावर सुध्दा विचार केला पाहिजे.
महिलांना पूर्वी राजकारणात स्थान दिले जात नव्हते, परंतु भारतीय राज्यघटनेनुसार महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रात कामगिरी करता येत आहे.
पूर्वी महिलांना चूल आणि मूल यामध्ये गुरफटून रहावे लागत असे. मात्र आता महिला एकत्रित येऊन, बचत गटाची स्थापना करुन त्यामधून एखाद्या उद्योगाची उभारणी करून स्वयंरोजगाराची निर्मिती करता येते. त्यातून स्वतः व कुटुंबाचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत मिळेल. त्यामुळे या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने स्वयंसहाय्यता बचत गटाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
बचतगट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेऊन करायला पाहिजे. या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा.जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. आपल्या देशात बचतगट झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: ग्रामीण भारतात हे फार चांगले कार्य करू शकते. अर्थव्यवस्था आणि समाज यावर चांगला परिणाम होईल. बचतगटाच्या मदतीने बऱ्याच गरीब स्त्रिया उपलब्ध स्थानिक स्त्रोतांसह, त्यांचे कौशल्य आणि ज्ञानाने स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी होने गरजेचे आहे.
बचत गट ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे असायला हवे. बचत गट केवळ महिला सबलीकरणच नव्हे तर महिलांच्या गुंतवणूकी, उत्पादन आणि महीला विकसनशील प्रयत्नांच्या बाबतीतही विचार केला पाहिजे.
बचत गटाच्या माध्यमातून स्त्री बळकटीकरण
महिला सशक्तीकरण म्हणजे काय? स्त्री सक्षमीकरण म्हणजे स्त्रीच्या अंगी निर्णय घेण्याची, निर्णय करण्याची, संघटित करण्याची, समता व मतप्रदर्शन करणे, कृतिशील कार्यक्रम घडवून आणणे, लोकसंपर्क, जनसंपर्क, संस्था संपर्क, आर्थिक व्यवहार इत्यादी करण्याची क्षमता व आवड निर्माण होणे त्यास महिला सशक्तीकरण म्हणतात.
महिला बचत गट म्हणजे काय? एकाच वाडीवस्तीतील, एकाच सामाजिक, आर्थिक स्तरामधील, समविचारी, समान गरजा असणाऱ्या 10 ते 20 महिलांच्या संघटनेस महिला बचत गट असे म्हणतात. परंतु झरी तालुक्यातील बचत गट तर्फे कोणतेही महीला उद्योग सुरू करण्यात आल्याचे दिसून येत नाही. महीला सशक्तीकरण होईल असे स्टेजवर बोलने सोपे परंतु प्रत्यक्षात ७० टक्के गावात काहीच महीला उद्योग नाही. शेतमजुरी करूनच महीलांच्या जीवनाचा प्रवास दिसते. तर महीला सक्षमीकरण कसे होईल. यावर जिल्हा व तालुका स्तरावर महीला सक्षमीकरणाच्या अडचणी लक्षात घेतल्या पाहिजेत. यावर विचार करून आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. तरच काहीतरी बदल दिसून येईल
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...