वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण गायकवाड( राळेगाव तालुका प्रतिनिधी): यवतमाळ- १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील चांदा ( चंद्रपूर ) चे आद्य क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनीतील कासाबाई चिंधुजी पुरके सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राज्याचे आदिवासी समाजाचे नेते अॅड.शिवाजीराव मोघे हे होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख,माजी उपाध्यक्ष जि.प.यवतमाळ बाळासाहेब मांगुळकर ,बाभुळगाव नगर पंचायत च्या नगराध्यक्षा सौ.संगिताताई मालखुरे,कळंब नगर पंचायत च्या नगराध्यक्षा अफरोज बेगम फारुख अहमद सिद्धिकी ,राळेगाव नगर पंचायत अध्यक्ष रविंद्र जी शेराम, आदिवासी समाजाचे नेते दशरथजी मडावी,यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनमालाताई राठोड ,संचालक आदिवासी विकास महामंडळ मधुकरराव काटे , वक्ते प्रा.माधवजी सरकुंडे ,प्रा.प्रविणजी देशमुख ,प्रा.दिपकजी वानखेडे,रमेशराव कुडमेथे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी,वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले आपल्या प्रास्ताविकात बोलताना पुरके सर म्हणाले की ,या शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी संघटन शक्ती व्दारे लढा देणाऱ्या या गोंडवाना तील महान क्रांतीकारच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले .या कार्यक्रमात आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना अॅड शिवाजीराव मोघे म्हणाले की, आपल्या कर्तृत्वाने गोंडवाना तील रणशिलतेचे मानदंड ठरलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा लढा सर्वसामान्यासाठी होता असे सांगुन जयंतीच्या माध्यमातून समाजाने त्यांच्या विचारांचाआदर्श घेण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात दोन सत्रात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या सत्रात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकाचे योगदान या विषयावर प्रा.प्रविण देशमुख व रमेशराव कुडमेथे यांनी वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.प्रा.प्रविणजी देशमुख यांनी आपल्या ओघवती वाणीने इतिहासातील अनेक दाखले देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . दुसऱ्या सत्रात आपले संविधान व आजचा भारतीय समाज या विषयावर प्रा.माधवजी सरकुंडे व प्रा दिपकजी वानखेडे यांनी वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना आदिवासी समाजासाठी संविधान किती आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमात राळेगाव ,कळंब,बाभुळगाव येथील नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन अरविंद मडावी यांनी केले आभार प्रा.वसंत पुरके यांनी मानले या कार्यक्रमाला समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...