आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: तालुका वन क्षेत्र अनेक ठिकाणी पळस फुलांनी बहरलेला आहे. केसरी रंगाच्या फुलांनी अनेक वनामध्ये सुंदर पळस फुलांनी वन जंगलाची शोभा वाढवीली आहे. लाल केशरी फुलांनी बहरलेला पळस होळी रंगपंचमी दिवस आल्याची जाणीव करून देत आहे. पळस केशरी फुले पाहून जून्या आठवनी जाग्या होतात. मार्च महिन्यात येणारा रंगपंचमी उत्सव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक रंग भरून जातात.
या उत्सवात दुरचे संबंध जवळ येतात. मीत्र मैत्रीणीचा आनंद तर गगणाला मावेनासा असतात. होळी रंगपंचमी म्हटलं तर मीत्र मैत्रीण मध्ये मोठा उत्साह. पुर्वी तर होळी रंगपंचमी म्हणजे आनंदच आनंद. मित्रांसमवेत आठ दिवसांपासूनच रंगीत चर्चा सोबत होळीची तयारी करण्यात व्यस्त. शेनाच्या गोल चकत्यांच्या माळा बनवायच्या आणि होळी सनाच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत राहायचं. तेवढ्यातच होळी जवळ येता पाहून लाकडी झूला, पाळना बनवून मराठमोळ्या शायरी म्हनत झूलायची मस्त मजा असायची. असेच दिवसांमागून दिवस जाताच होळीचा दिवस यायचा. होळीच्या दिवशी संध्याकाळी वडील धारे मानसे प्रत्येक घरची लाकडे जमा करून होळी पेटवायचे. त्याच होळीत च्यार दिवसा अगोदर बनवलेला लाकडी झूला, पाळना सूद्धा जाळायचे.
गावातील प्रत्येक घरची मंडळी हातात एक गडवाभर पाणी पुजेचे साहित्य घेऊन पुजा करायची ती आजही पुजा करतात. शुद्ध विचार जोपासा व वाईट विचार पेटत्या होळीत अर्पण करायला आपल्या मुला मुलींना शिकवायचे. नंतर गोडधोड जेवण करून रात्र जायची. त्या रात्री स्वप्न रंगपंचमीचेच असायची. त्या रात्री उकडच झोप असायची पाहता पाहता दिवस केशरी रंगाचा उजेडत निघायचा. चिमण्या पाखरांचा आवाज ऐकून उठायचं. उठल्यावर शेनाच्या बनवलेल्या माळा घेऊन होळीच्या दिशेने मित्रांसमवेत निघायचं. सकाळी सकाळी शेनाच्या चकत्यांच्या माळा होळीत टाकून त्या राखेचा टीका सर्व मुलं आनंदात लावायची. आणि घरी परत येताच रंगपंचमी खेळण्यास सुरुवात व्हायची. पळस फुलांनी बनवलेला केशरी रंग मोठ्या आनंदाने मैत्रीचा रंग समजून एकमेकांना रंगवायचे. अनेक मीत्र एकमेकांच्या मागे धावत पळस फुलांचा केशरी रंग शिंपायचे. पळस फुलांनी बहरलेला सन केशरी रंग एक अलग मॅजीक असायच. रंग बादलीत भरून ठेऊन रंगीत दिवशी सकाळी पिचकारीत भरून शिंपन्याची मजा म्हणजे फार मोठा उत्साह असायचा.
एकमेकाना आलिंगन देऊन केशरी रंग लावण्याची एक वेगळ्या प्रेमाची मजा असायची. अशा प्रकारचे वेगवेगळे सन उत्सव प्रेमळ नात टीकवण्यासाठी व प्रत्येक व्यक्तीला एकत्र आनंद घेण्यासाठी आवश्यक. आता आधुनिक काळात नवनवीन बाजारात केमीकलचे रंग उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे चेहरा खराब होण्याची भीती आहे. सुभेच्छा तर वाॅट्सअपवरच देतात. व्यक्तीला समोरासमोर भेटायची आवश्यकता राहली नाही. व्यक्ती पासून व्यक्ती दूर की जवळ काहीच समजत नाही. परंतु जून्या रूढी परंपरा सन, उत्सव मानवी जीवनात नवा आनंद, नवा उत्साह निर्माण करतात यात तिळमात्र शंका नाही.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...