आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
झरी: तालुक्यात असा एकही गाव नसेल की त्या ठिकाणी पाटील, पुढारी नसेल. आमदार, खासदार, मंत्री अशा मोठ मोठ्या नेत्यांच्या संपर्कात लाहानात लाहान गावचे पुढारी असतात. छोट्याशा कामाच्या समारंभात मोठे नेते आवर्जून हजेरी लावल्याचे पहायला मिळतात. पुढार्यांच्या लग्न समारंभ, वास्तू शांती समारंभ, वाढदिवस समारंभ, अशा ईतरही अनेक कार्यात मोठ्या नेते पुढार्यांना आवर्जून बोलावतात. हितसंबंध ठेवावेच लागतात. मोठ मोठे नेते पुढारी यांचे नातलग असतात, मैत्री चे संबंध असतात, कोणी कोणाच आवडीचे असू शकतात. यात काही शंका नाही. पन खेडे गावातील जे स्वार्थी,मतलबी, लोकांची दिशाभूल करणारे पुढारी असतात.
जे मोठ्या नेत्यांना बोलावून फक्त मोठेपनाचा दिखावा करतात. अशा व्यक्तींबद्दल मत मांडायच आहे. यांच्यासाठी मोठा नेता लाहानशा पुढार्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने समारंभाची शोभा वाढून छोट्या गावातील पुढारी मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आल्याची माहिती गावकऱ्यांना दिसते.
परंतु एवढे मोठे संबंध आहे मोठे नेते, पुढारी गावात येतात तर त्यांना छोट्या गावातील समस्या दिसत असेलच एकही नाली नसलेली समस्या, रस्त्याची समश्या, नळ योजनेच्या पाणी पुरवठा समस्या, शिक्षण समस्या, कचर्याच्या समस्या, रस्त्याने खताच्या समस्या, विजेच्या समस्या, प्राथमिक आरोग्य केंद्र समस्या, स्मशानभूमी समस्या, अतिक्रमण समश्या, कृषी समश्या अशा ईतरही शेकडो समश्येकडे लक्ष जात असेल तर मोठे नेते स्वार्थी गाव पुढार्यांबद्दल काय समजत असेल. चांगला की टाईम पास पुढारी. चांगला तेव्हाच समजेल जेव्हा मोठा नेता लाहान गावात प्रवेश करताना विकासात्मक कामे दिसेल तर. अन्यथा मतदान मिळविण्यासाठी वेळेपुरता संपर्क ठेवणार. हे मात्र नक्की.
या सर्व गोष्टी जनते पर्यंत पोहचवण्याच तात्पर्य एवढंच की विधानसभा, लोकसभा मोठ मोठ्या निवडणूकीत काही स्वार्थी गाव पुढारी गरीबात गरीब, सामान्य, मजूरदार, सर्वसाधारण लोकांच मतदान भरमसाठ मेहनत घेऊन मोठ्या नेत्यांना मिळवून देतात. एवढी मेहनत पैशासाठी, मोठेपणा साठी की कशासाठी गरज काय. आज प्रत्येक घरचा एक तरी मूलगा, नातू, पुतन्या सारखे तरूण युवक शिक्षण शिकलेले आहेत. त्यांना समजत नाही काय ? स्वर्थी गाव पुढारी गरीबांच्या शिक्षणाला काय समजतात. फक्त स्वताच हित पाहणारा स्वार्थी पाटील पुढारी असेल तर खेडेगावात कोणताच विकास होत नाही. याच कारणही तसेच आहे. हे स्वर्थी, मतलबी गाव पुढारी दर पाच वर्षांला हितभर काम करून पंचवार्षिक चे पंधराशे दिवस मेवा खातात की काय असे अनेकांना वाटते. स्वर्थी पुढार्यांच्या राजकारणाला कोणी कवडीच महत्व देत नाही. स्वर्थी,मतलबी पुढारी यांना महत्त्व फक्त त्यांच्या फेकलेल्या तूकड्यावर जाऊन पडणारेच देत असतील. स्वर्थी, मतलबी,गरीबांची दिशाभूल करणारे गाव पुढार्यांसोबत दारूडे, नंबर दोन धंदेवाईक, झगडेखोर, बिघडलेली मंडळी असतात. यांना ओळखा व सतर्क व्हा. चांगले व वाईट पुढारी ओळखाल तरच गाव प्रगती परखाल.
आजच्या स्थितीत शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन स्वार्थी मतलबी पुढार्यांना सामायन बाजूला ठेवल्यासारख साईडने ठेऊन द्या. काहीच काम नाही यांच आपल्या घरच्या शिक्षण शिकलेल्या व्यक्तीच ऐका. परंतु स्वर्थी, मतलबी, दूरदृष्टीकोण ठेवून टाईमपास पुढार्यांपासून सावधान व्हा.
विचार केला तर असे अनेक उदाहरण आहे की लाहान गाव पुढार्यांनी काही ठिकाणी चांगली सूद्धा कामे केली. छोट्याशा गावातील विविध समाजातील गावात, आदिवासी गावात गावपुढार्यांनी मोठ्या नेत्यांच्या संपर्कात राहून गावांतील नाली बांधकाम, पाणी पुरवठा टाकी, शौचालय, स्मशानभूमी, गाव गल्लीतील रस्ते, विज पुरवठा गावासाठी, कचरा साफसफाई अशी विविध प्रकारची प्रगती केलेली खेडेगाव सुध्दा आहे. कारण त्या ठिकाणचे गावपुढारी आपल्या गावातील प्रत्येक समाजातील गरीब, सामान्य व्यक्तीच्या सोई सुविधा उपलब्ध करण्यावर भर देतात. त्यांच्या कार्यातून मोठ मोठ्या नेत्यांचा संपर्क दिसून येते. अशाच गावपुढार्यांच गावातील प्रत्येक व्यक्तीशी चांगले नाते संबंध असल्याचे दिसून येते. कारण कार्यातुनच व्यक्ती महान होत असते. गावपुढारी कार्यातून ओळखले जाते.
परंतु तालुक्यात काही ठिकाणी निरीक्षण केल्यास असे निदर्शनास येते की स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे पूर्ण होऊन सूद्धा एकही नाली बांधकाम नाही. रोड रस्ते दुरुस्ती नाही, स्मशानभूमी नाही, लाईट नियमीत लावल्या जात नाही, साफ सफाई नाही, सार्वजनिक शौचालय नाही. या गोष्टी स्वतंत्र्याच्या ७५ वर्षे होऊन झाल्या नाहीत. कमालच आहे ना. यांचे कारण शोधने गरजेचे आहे. या बद्दल निरीक्षण केल्यास समजेल की आज पर्यंत पिढ्या न पिढ्या स्वर्थी, मतलबी, राजकीय व्यक्तींनी अशिक्षीत,कमी शिकलेल्या गरीब सामान्य लोकांचा फायदा घेणारं राजकारण केलं. म्हणून लक्षात घेतल पाहिजे की शिक्षणातून राजकारण आहे. यासाठी घरचा व्यक्ती चार वर्ग शिकलेला असल्यास त्याच्या शिक्षणाला महत्त्व देऊन निर्णय घेतला पाहिजे. स्वर्थी, मतलबी, दिशाभूल करणार्या राजकाण्याला गावातला कचरा समजा. शिक्षणाला महत्त्व देऊन हा कचरा सर्वात आधी साफ करा. तरच सुंदर खेडेगावाच स्वप्न साकार होईल. स्वच्छ सुंदर गावाचं स्वप्न पाहणार्या चांगल्यात चांगल्या राजकीय व्यक्तींचा सन्मान करा.
त्याच बरोबर स्वर्थी, मतलबी, मतांचा गैरफायदा घेणार्यां राजकारण्यांना ओळखा. व त्यांच्या विचारांपासून जितके दूर राहता येईल तितके दूर रहा. तरच स्वच्छ सुंदर गावाचं स्वप्न साकार होईल.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...