Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव मैत्री कट्टा...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे महिला दिन साजरा || दोन दिवस भरगच्च कार्यक्रम.

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे  महिला दिन साजरा || दोन दिवस भरगच्च कार्यक्रम.

सांस्कृतिक रॅली ने लक्ष वेधले.

मारेगाव:- येथिल मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने मारेगाव येथे जागतिक महिला दिन निमित्य दोन दिवसीय भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

  एकेकाळी शहरात मोठी सामाजिक, सांस्कृतिक चळवळ राबविणाऱ्या मारेगाव च्या युवकयुवतींनी तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने मारेगावात नवीन पिढीला चालना देण्यासाठी मैत्री कट्टा ग्रुप ची स्थापना केली आहे.

  या ग्रुप तर्फे मारेगाव येथे जल्लोष 2022 नावाने भव्य महिला दिन साजरा करण्यात आला.सकाळी शहरातून महिला सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. यात विविध देखावे, लेझीम पथक,दंडार पथक,पथनाट्य यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री खास महिलांकरिता एकल,युगल,समूह अश्या तीन गटात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यात समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक हॅपी डान्स ग्रुप ने पटकावले तर द्वितीय सुवर्णा नरांजे & ग्रुप,तर तृतीय पिंगा ग पोरी पिंगा ग्रुप यांनी पटकावले.तसेच एकल नृत्य स्पर्धेत मीरा दुपारे यांनी प्रथम तर ज्योत्स्ना भोगेकर यांनी द्वितीय तर नेहा वाघदरकर यांना तृतीय पारितोषिक मिळाले.तसेच युगल नृत्य स्पर्धत गुंडावार व प्रिया घाणे या प्रथम तर वैशाली सारवे व रुपाली दुधकोहळे द्वितीय तर चित्रा दैने व अश्विनी ठेपाले यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

सत्कार समारंभ मध्ये नवनिर्वाचित महिला नगरसेवीकांचा व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्धा, आशा वर्कर,सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला,आर्थिक सबलीकरण करणाऱ्या महिला,पत्रकार बंधु, यांचा सत्कार  सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत जिनिंग  व रंगनाथ स्वामी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ऍड.देवीदासजी काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अरुणाताई खंडाळकर,प.स.सभापती शितलताई पोटे, नायब तहसीलदार अरुण भगत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय रायपुरे यांनी केले. संचालन बिना हेपट आणि मेहमुद  खान यांनी केले तर  आभार मिलिंद डोहणे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिना हेपट,दीपक जुनेजा, प्रतिभा डाखरे ,शैलजा ठाणेकर ,उदय रायपुरे,गजानन जयस्वाल,मयुरी जयस्वाल,वनमाला बोढे, मंजुषा भगत,माया गाडगे,वंदना गाणार,अनिता खैरे, सरिता वानखेडे, शितल मडावी आदी मैत्री कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...