Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मतदार बंधुनो सावधा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मतदार बंधुनो सावधान..!

मतदार बंधुनो सावधान..!
ads images

पिंप्रड ग्राम वि. कार्यकारी सहकारी संस्था मर्या. निवडणूकीच्या नामेनीशन फार्म वर सुचक अथवा अनुमोदक वर एका मतदाराला घूमवुन व्यक्तीच्या कमी शिक्षणाचा फायदा घेऊन सह्या घेतल्या त्यामुळे मतदार बंधू सावधान.

तालुका प्रतिनिधी: झरी तालुक्यातील  पिंप्रड ग्राम वि कार्यकारी सहकारी संस्था मर्या. निवडणूकची नामीनेशन प्रक्रिया चालू आहे. पिंप्रड सोसायटी निवड प्रक्रियेत पिंप्रडवाडी, पिंप्रड, गूळा, बैलंपुर ही चार गावे मिळून सदस्य नामीनेशन फार्म भरत असल्याचे दिसून येत आहे.  निवडणूक कोणतीही असो मतदाराला स्व ईच्छेने कोणत्याही अमीशाला, दबावाला बळी न पडता मतदान करण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु काही उमेदवार व उमेदवाराचे संबंधी जून्या कमी शिकलेल्या मतदार बंधूंना एकाचे दोन सांगुन, घुमवून, सह्या नेतात अशा कारणांमुळे अनेक वर्षांपासून एकाच घरातील सदस्य राहीले. निरक्षर अथवा तिसरा चौथा वर्ग कमी शिकलेल्या व्यक्तीचा पुरेपूर फायदा घेत असल्याची चर्चा आहे.  व त्यामुळे मतदार हे मतदानच करत राहिले. यावर्षी पिंप्रडवाडी, गुळा, पिंप्रड,बैलंपुर मतदार घराणेशाही सत्तेवर नाराज असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांपासून सहकारी सोसायटीच्या सदस्यांची निवड बिनविरोध होत आली. हे पाहण्यासाठी जरी योग्य वाटत असले तरी कमी प्रमाणात शिक्षण असलेल्या मतदार बंधूंना घूमवुन, घरात झगडे लावून, दबाव तंत्राचा वापर करून नामिनेशन फार्मवर सुचक अथवा अनुमोदक लिहिलेल्या ठिकाणी सह्या घेत आले असे दिसून येते.

 कारण ८ मार्च व ११  मार्च  ला सकाळी पिंप्रडवाडी येथे सहकारी सोसायटीशी  संबंधित व्यक्तीने घरचा सुशिक्षीत मूलगा हजर नसल्याचा डाव साधून वडीलाची नामीनेशन फार्म वर सुचक अथवा अनुमोदक या ठिकाणी सही घेतली. नंतर वडीलांनी सुशिक्षित मूलगा व ईतर दोन व्यक्तीला घडलेली हकीकत सांगितली एकाचे दोन सांगुन घुमवून दबाव टाकून  सही नेल्याबद्दल पच्छाताप झाला असल्याचे सुध्दा सांगीतले. यावरून खरोखर सदस्य निवड प्रक्रिया कशी हे समजून घेणे गरजेचे आहे. त्या बेशरम धनाढ्य व्यक्तीने अशा पद्धतीने फार्म भरला व झरी तहसील कार्यालय येथे फार्म सबमीट करणार. यावरून असे स्पष्ट होते की सहकारी सोसायटी सदस्य निवड प्रक्रियेत सुधारणा होने गरजेचे आहे. अन्यथा पुर्वीपासून एकाच घरातील व्यक्ती सत्तेचा उपयोग घेणार. आणी या पुढेही मतदारांच्या कमी प्रमाणात शिक्षण असलेल्यांचा फायदा घेत या पुढेही फायदा घेणार. 

यासाठी तहसीलदार साहेबांनी  उमेदवार व्यक्तीच्या नामीनेशन फार्म वरील सुचक अथवा अनुमोदक सहीची प्रत्यक्ष हजर करूनच पडताळणी करावी. तेव्हाच उमेदवार खरा की खोटा कळेल.  अन्यथा मतदारांचा विश्वास निवडनुकीवर पाहिजे तेवढा राहणार नाही. हे मात्र नक्की. यासाठी मतदार बंधू सावधान.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...