Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / मारेगाव शहरात महिला...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

मारेगाव शहरात महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमांची सुरुवात.

मारेगाव शहरात महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री कट्टा ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमांची सुरुवात.

तालुक्यातील महिलांनी घेतला मोठ्या प्रमाणात सहभाग.

मारेगाव : शहरातील  मैत्री कट्टा  ग्रुप च्या वतीने दि. 8 मार्च रोजी महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 9 मार्च रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मारेगाव शहरांमध्ये भाव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत  सुवर्णाताई खामनकर, रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषेत कालिंदी ताई रायपुरे, सावित्रीबाई फुलेयांच्या वेशभूषेत पुष्पाताई ताकसांडे, मा जिजाऊच्या वेशभूषेत दामिनी दांडेकर या होता. तर वैशालीताई साळवे यांनी लेझिम संच व आदिवासी नृत्य शकुंतला आत्राम यानी साकारण्यात मोलाचे कार्य केले. 

शहरामध्ये प्रथमच महिला जागतिक दिना निमित्त मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती या रॅलीमध्ये असंख्य महिला वेगवेगळ्या वेशभूषेत शहरातून पटनाट्य लेझीम बुलेट दुचाकी रॅली सामोरं दोन मुली मिल्ट्री ड्रेस परिधान करून त्याच्या मागे घोड्यावर स्वार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा साकारण्यात आली.या मध्ये महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांना  व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून  या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून  या अनुषंगाने 30 वर्षा वरील स्त्रियांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल, या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या मागचा उद्देश ठेवून  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी सुविधा भवन  येथे आज सायंकाळी आठ  वाजता शेतकरी सुविधा भवन येथे  सांस्कृतिक कार्यक्रम(स्पर्धा) आयोजित केलेले आहे. तरी या कार्यक्रमात महिलांसाठी एकल डान्स, ग्रुप डान्स, वेशभूषा, पटनाट्य असे अनेक उपक्रम घेण्यात येत असून या नुत्य स्पर्धेत महिलांसाठी बक्षिसाची संधी आहे.

तसेच, 10 मार्च रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्पर्धेत क्रमांक प्राप्त महिलांचा बक्षिस वितरण व सत्कार सोहळा पार पडणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. या आयोजना ला यशस्वी करण्याकरीता बिना दुपारे, प्रतिभा डाखरे , वणमाला बोडे, दीपक जुनेजा ,उदय रायपूरे, बदरुद्दीन काझी अथक प्रयत्न करीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

मारेगावतील बातम्या

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...