Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सामाजिक विकासासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सामाजिक विकासासाठी ग्रामीण महिला सशक्तीकरण आवश्यक.

सामाजिक विकासासाठी ग्रामीण महिला सशक्तीकरण आवश्यक.
ads images

झरी :- तालुक्यात अनेक ठिकाणी ८ मार्च रोजी जागतिक महीला दिवस कार्यक्रमातून पहायला मिळाले. महीलांना सन्मान मिळायलाच हवा यात काही शंका नाही. कारण नारी शक्तीच्या  जोरावर अनेक ठिकाणी महिलांनी आपले पाऊले रोवली आहे  बस चालक ते देश चालक असा अनेक क्षेत्रातील महत्वाचा पुरुषांच्या  खांद्याला खांदा लावून महिला आज नावलौकिक करताना दिसत आहे. प्रत्येक क्षेत्रात नारी शक्ती उत्तम कर्तव्य पार पाडत असल्याचे सुध्दा निदर्शनास येते. शैक्षणिक क्षेत्रात सूद्धा अव्वल च्या बरोबरीने आहे. स्त्री- शक्ती  ही शक्ती आहे. जगाच्या इतिहासात महीला दिवसाला फार महत्व आहे. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 

दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरदारपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

 त्यामुळेच ८ मार्च हा जागतिक महीला दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनाच्या माध्यमातून साजरा करतात. भारतात शहरी भागात वीविध क्षेत्रात महिला समोर येत आहेत परंतु ग्रामीण भागातील महीलांचा विकास फारसा झालेला वाटत नाही. छोट्या मोठ्या खेडेगावातील महीला शिक्षणात अग्रेसर आहे. परंतु त्यात काही महीलांच शिक्षण विवाहा पर्यंतच मर्यादित असल्याचे वाटते. झरी तालुका हा मागासलेला तालूका आहे. या तालुक्यातील काही महीलांना आधुनिक काळात सुध्दा महीला राखीव आरक्षणामुळे फक्त सरपंच पदावर विराजमान होता आलेल्या दिसत आहे. परंतु  सर्वसामान्य  मधून निवड करायची झाल्यास कीती परीवारामधून महीलांना सामोर केले जाते. यावर विचार केल्यास हेच समोर येईल की शेकडो पूरूषांमध्ये बोटावर मोजन्याईतक्याच महीला दीसेल. 

ही स्थिती आधुनिक काळात सूद्धा का. राखीव महीला आरक्षनामुळे पुरूषांचा नाईलाज असतात म्हणून राखीव जागेवर महीला पदावर विराजमान दिसतात. महीलांना हक्क मिळने आवश्यक. झरी तालुक्यातील महीलांना आजही बर्याच प्रमाणात घरघूती चुल व मुल, कूकींग च्या कामासाठीच असल्याचे पाहीले जाते. हे आधुनिक काळातील महीलांच दुर्दैवच म्हणावं लागेल. यासाठी महीला सशक्तीकरण आवश्यक आहे. अनेक ठिकाणी महीलांची कुचंबणा होते. ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी महीलांना शासकीय सोई सुविधाचा  अभाव जाणवते. खेडेगावात पिढीजात उत्तम संस्कृती आहे की महीलांनी  प्रामाणिकपणे पुरूषांचा सन्मान ठेवने तसेच पुरूषांनी सूद्धा प्रामाणिकपणे महीलांचा सन्मान  कायम ठेवने. या दोन्ही गोष्टींच खूप महत्त्व आहे.  आपल्याच देशात झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, अहील्याबाई होळकर, सारोजीनि नायडू,सुश्मा स्वराज , लता मंगेशकर, जय ललीता अशा अनेक ईतरही महीलांनी उत्तम कर्तव्य पार पाडत इतिहास घडविलेला आहे. पन इतिहास घडवलेला महीलांचा इतिहास कीती महीलांना वाचायला मिळते, हा प्रश्न ग्रामीण भागात खेडेगावात ज्यास्त आहे.  महीला व पुरूष यात वारंवार फरक दाखवून महीलांना कमी समजू नये. भारताच्या प्रत्येक शासकीय कार्या मध्ये पुरूषांप्रमाणे महीलांच सूद्धा भरपूर योगदान आहे. जगाच्या इतिहासात सूद्धा महीलांनी विविध क्षेत्रात ठसा उमटवीला आहे. म्हणूनच जागतिक महीला दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबवून साजरे केले जातात.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...