Home / यवतमाळ-जिल्हा / स्त्री अधिकार - अॅड....

यवतमाळ-जिल्हा

स्त्री अधिकार - अॅड. संदिप गुजरकर यवतमाळ.

स्त्री अधिकार   - अॅड. संदिप गुजरकर यवतमाळ.
ads images
ads images
ads images

पूर्वी बालविवाह होत असत त्यातून स्त्रीयांचे अनेक अधिकार डावलले जायचे, त्यांची प्रगती ख़ुठली जायची. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे, पत्नी या नात्याच्या नावाखाली तिची हत्या, तिचा शारिरीक मानसिक हिंसाचार केला जायचा. ज्यामुळे पुढे ४९८ (अ), खावटी कलम १२५ (C.R.P.C), कलम २४ चे मेंटेनेंस (हिंदू विवाह कायदा), डि.व्ही.चे कलम १२ ते २२, महिला सुरक्षा विशेष कक्ष असे संरक्षणात्मक कवच स्त्री ला देण्यात आले.   परंतु,कालांतराने आज त्या कवचाचा सदुपयोगा सोबतच अपवाद वगळता दुरुपयोग होऊ लागला आहे. त्यामुळे स्त्री-पुरूष सम ता या संकल्पनेचा आज जागर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. स्त्रीयांना आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, त्यांच्यातील प्रगतीची साक्ष कल्पना चावला, प्रतिभा पाटिल, लता मंगेशकर, ऐश्वर्या रॉय-बच्चन, किरण बेदी, मेरी कोम यांच्यातून आपल्याला दिसते. 

Advertisement

त्यामुळे आज सर्वांनी आपण अभिमानाने मिरवावे व जर चुकिचे कृत्य स्त्री च्या विरूध्द होत असेल तर त्या विरूध्द आवाजही : उठवावा. स्त्रि सक्षमीकरणाच्या गोंडस नावाखाली केवळ महिला दिनीच स्त्रियांवर शुभेच्छांचा वर्षाव व्हावा व उर्वरित दिनी तिला दुय्यम वागणूक द्यावी ही पुरूषसत्ताक पद्धतीमध्ये पुरुषांचे हित साधण्याच्या आसुरी वृत्तींमुळे अनेकांची वाताहत झाली.विवाह संस्थेसारखी नात्याची विण घट्ट करणारी व्यवस्था पुरुष श्रेष्ठतेमुळे भांडन-तंट्याची धनी ठरू पाहत आहे.

 विवाह संस्थेवरील विश्वास कमी होणे हे आजच्या घडीला कोणत्याही
समाजातील नागरिकांना परवडणारे नाही हे विधान केल्यास आपल्या मेंदूला मुळव्याध व्हायला नकोत.  या उलट आपले बंदिस्त कवाडे उघड होऊन कोणतेही नाते उसविणार नाही.  विवाह संस्थेत मुलामुलींच्या नातेवाईकांनी त्यांनां संसार करायला बळ द्यायला हवे ते सोडून त्यांचे वैवाहिक जीवन कठिण करण्याचा प्रयत्न होत असतो त्यातून पती पत्नीच्या तंट्यात वाढ होत आहे.

पण,निमित्याने पती-पत्नीच्या दुचाकीचे ड्राइव्हर होण्यात त्यांच्या नातेवाईकांना धन्यता वाटत असते. विवाह संस्था टिकविण्याकरीता पती पत्नीच्या नात्यात आयुष्याभर एकमेकांस विश्वासाच्या कुबड्याचा आधार घ्यावा लागतो. त्या विश्वासाला तडे गेल्यास कौटुंबीक विवाद चार भिंतीच्या बाहेर येऊन संबंधीतांचे प्रकरण पोलीस स्टेशन व पर्यायाने न्यायालयांमध्ये जात असते. न्यायालयात न्याय म गायला पक्षकारांनी जातांना, न्यायालयाकडे साकडे घालतांना क्लीन हँडने जायला हवे हे झाले मुलभूत तत्व. परंतु, बऱ्याचवेळी असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे की, क्लीन हँडला धाब्यावर बसवून, घरघुती हिंसाचार कायदा, ४९८ (अ) चा दुरुपयोग होत होता. अटकेत पतीला व त्याच्या नातेवाईकांना नाहक खोट्या प्रकरणात गोवल्या जायचे.

प्रकरणाच्या शेवटी लक्षात यायचे की, ते नातेवाईक तर पिडीतेच्या पतीच्या घरी सुध्दा राहत नाही किवा ते पतीचे नातेवाईक खुपच वृध्द आहे किवा कित्येक वर्षांपासून खाटेवरील रुग्ण आहे. केवळ वैयक्तीक खुत्रस पूर्ण करण्यापोटी खोट्या केसेसमध्ये त्यांना गोवण्यात आले असतं. हा लेख लिहितांना मला नक्किच माहिती आहे की, जो माझा वाचकवर्ग आहे जर तो या परिस्थितितीमधून गेला असेल तर त्यांच्या आयुष्यातला तो पट सर्रकन्त्या च्या डोळ्यांपुढे येईल. सर्वोच्य न्यायालयाने अर्नेश कुमार - विरूध्द बिहार राज्य (वर्ष २०१४) या प्रकरणामध्ये गाइडलाइन सर्व राज्य सरकारला प्रसुत केल्या की, पोलीसांनी ४९८ (अ), डि.व्ही. 

मध्ये चौकशी खेरीज अटक करायची नाही अर्थात त्यांना मवाळ बनविण्यात आले. C.R.P.C. कायद्यातील कलम ४१, ४१, B, D चे अनुपालन व्हावे तसेच कलम ४१ नुसार आरोपीला अटक करणे आवश्यक नसल्यास उपस्थीत राहण्यास पोलीस नोटिस काढू शकते.) तथा ज्यात ७ वर्षापर्यंत शिक्षा सांगीतलेली आहे त्याला सुध्दा लागू होऊ शकतो. एका वेगळ्या अर्थाने समाजामध्ये नकारात्मक सुर दिसून येत आहे की, कितीही कायदे अंमलात असले तरी महिलांना
न्याय मिळत नाही व मिळालाच तर वेळ गेलेली असते त्यात कुण्या महिलांची अब्रू तर कुण्या म हिलांचा जीव गेलेला असतो तरीही आरोपीला पोसल जातं. उदा. निर्भया प्रकरण, हिंगणघाट जाळीत कांड
इत्यादी. परंतु, एक कायद्याचे तत्व लक्षात घ्यायला हवे ते म्हणजे udi alteram partem means listen to the other side अर्थात कुणालाही त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याच्या प्रकरणी
न्यायनिर्णय देता येणार नाही,भारतीय दंड संहितेच्या चॅप्टर तिन तथा कलम ५३ नुसार पाच प्रकारच्या पनिशमेंट (शिक्षा) सांगितल्या आहेत.

त्यात Death (मृत्युदंड), डळषश खाळिीपाशपीं (जन्मठेप), Rigorous with hard labour (सश्रम कारावासाची शिक्षा), Simple Imprisonment (साधा कारावास), Forfeiture of property (संपत्ती जप्त), Fine (दंड) ईत्यादी स्वरुपाच्या शिक्षात्मक तरतुदी घडलेल्या अपराधानुसार करण्यात आलेल्या आहेत. घटस्फोटानंतर अनेक दांपत्य दुःखाच्या वणव्यामध्ये होरपळून जाते. त्यावेळी त्यांना पालकांच्या आधाराची गरज असते व दुसरं म्हणजे ते गारद होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. दांपत्य घटस्फोटानंतर त्यांचे डोळे पाणावतात आयुष्याभरातील आधार, प्रेमाच्या आणाभाका एका
क्षणांत संपून भविष्यातील अगम्य वाट अंधकारमय दिसते. त्यामुळे योग्य वेळी समाजामध्ये कायद्याचा जागर करून विवेक पेरणे गरजेचे. वैवाहिक संबंधामध्ये अति जास्त क्लिष्ठता वाढायच्या आधीच नात्यांचा अल्गोरिदम सोडविणे गरजेचे तसे झाल्यास नाते टिकून कोणत्याही कायद्याचा स्त्रियांच्या बाजूने अथवा पुरुषांच्या बाजूने दुरुपयोग होणार नाही
कारण, एक वकिल म्हणून माझा कायद्यावर विश्वास आहे. 
 

- अॅड. संदिप गुजरकर
यवतमाळ, मो. नं. ८१८००५२३०३

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...