वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव: येथून जवळच असलेल्या नवरगाव (धरण) येथे तुळशीमाता मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीनंतर सात दिवसांनी यात्रा भरते. या वर्षीही येथे सात मार्च पासुन यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगावच्या एका टोकाला नृसिंह मंदिर (हेमाडपंथी) असून बर्याच जुन्या दगडी मूर्ती आहेत. गावाच्या मध्यभागी शिवालय असून गावापासून जवळच तुळशी वृंदावन देवस्थान आहे. या देवस्थानाचा उदय 1949 मध्ये महाशिवरात्रीपासून झाल्याचे सांगितले जात असून ही मारेगाव तालुक्यातील तपोभूमी असल्याचे मानले जाते.
देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र विकास निधीमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भव्य सभागृह, बगीचा कुंपण, पूर्ण परिसर विद्युतीकरण, प्रशस्त निवास, परिसराला संरक्षण भिंत इत्यादी विकासकामे झाली असून दहीहांडी माळा, पाकगृह व कार्यालय, विश्रामगृह बांधकाम प्रस्तावित आहे.
या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यात्रा महोत्सवाचे एक मार्च ते दहा मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. एक मार्च रोजी घटस्थापना, सात मार्च रोजी दुपारी एक वाजता गोपालकाला तथा दहा मार्च रोजी पाखडपूजा व घटविसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके, सचिव विलास नक्षणे, विश्वस्त रमेश सोनुले, अरुण नक्षणे, अफजलखान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोधाने, संजय मून यांनी दिली
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...