Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / स्वच्छ पाण्याच्या नावाखाली...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

स्वच्छ पाण्याच्या नावाखाली शासकीय निधीचा गैरवापर ।। तिन ते चार लाखाचा ऑरो फिल्टर प्लॅन्ट नव लाखापर्यंत कसा.

स्वच्छ पाण्याच्या नावाखाली शासकीय निधीचा गैरवापर ।। तिन ते चार लाखाचा ऑरो फिल्टर प्लॅन्ट नव लाखापर्यंत कसा.
ads images

झरी (प्रतिनिधी): झरी तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रामपंचायत माध्यमातून  मागील काही वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून ऑरो फिल्टर प्लांट बसविण्यात आले. शुध्द पाण्याची गरज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच आहे.  ग्रामीण भागात तर फारच कठिण परिस्थिती आहे. नद्या-तलाव-विहीरी यांचे पाणी पावसाळ्यात उपलब्ध होते तेही निसर्गाच्या लहरीनुसार. पण ते शुध्द व पिण्यायोग्य असेलच याची खात्री कोण देणार ? शहरातही, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कार्यालये, इस्पितळे, शाळा महाविद्यालये, रेल्वे किंवा बस स्थानके अशा सर्वच ठिकाणी सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही त्या त्या ठिकाणच्या नगरपालिकांची जबाबदारी आहे. तशीच ग्रामीण भागातही शुद्ध पिण्याच्या पाण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायत वर वाढलेली दिसते. जगाच्या पाठीवर आपण कोणत्याही भागात राहात असलो तरी निर्मल पाणी मिळावे असे सर्वांना वाटते.  

परंतु अनेक वृत्तपत्रांतून ऑरो प्लांट फिल्टर मध्ये भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहे.  तालूक्याच्या ग्रामपंचायत मध्ये ऑरो फिल्टर प्लांट जे बसविण्यात आले ग्रामपंचायतीला मिळालेले ऑरो प्लांट च्या शेडच्या जागेच क्षेत्र १० बाय १५ असतांना त्यपेक्षा ईतक कमी कस काय. शासनाच्या नियमानुसार ५०० लिटर पाणी फिल्टर प्लांट साठी १० बाय १५ फूट शेडचे क्षेत्रफळ पाहिजे. त्यातल्या त्यात फिल्टर प्लांट मधील मोटर पंप , चिल्ड मशिन, मेमरल, डोजींग पंप अशे ईतर  उपकरण आय एस आय मार्क असलेले कंपनीचे न वापरता लोकल कंपनीचे बसविले गेल्याची चर्चा तालूक्यातील बर्याच ग्रामपंचायत क्षेत्रात होत आहे. प्रश्न असा आला आहे की शासकीय निधीचा गैरवापर झाला असल्याच्या चर्चा आहे. एवढ मात्र स्पष्ट आहे की तिन साडेतिन लाखाचा ऑरो प्लांट फिल्टर  सात साडे सात नव लाखात तर  भ्रष्टाचार नाही तर काय आहे. एवढ्या फरकाने जर शासकीय निधीचा गैरवापर झाला असेल तर अख्या तालुक्यात कीती फिल्टर प्लांट बसविण्यात आले आहेत कोणकोणते फिल्टर प्लांट शासकीय नियमाला डावलून बनविले आहे, कीती फिल्टर प्लांट मध्ये ठेकेदाराच्या संगनमताने शासकीय निधीचा गैरवापर झाला. याची चौकशी व्हायला हवी.

या अगोदरही बर्याच वृत्तपत्रातून वारंवार बातम्या प्रकाशित झाल्या. की सरकार योजना नियोजन बरोबरच विचार पुर्वक असतात. पन भ्रष्टाचारांना, चोरांना शंभर वाटा. कुठे ठेकेदाराच्या संगनमताने भ्रष्टाचार, कुठे बीलाच्या वाढीव रक्कमेत भ्रष्टाचार, कुठे डूप्लीकेट बील जोडून भ्रष्टाचार, कुठे ठेकेदाराकडून टक्केवारी ठरवून भ्रष्टाचार, कूठे लाच देवानघेवा करून भ्रष्टाचार अशे भ्रष्टाचाराचे ईतरही मार्ग अवलंबून सरकारी पैसा हडपतात. पैशासाठी मेले मरत आहे. गरीब जनता मात्र  टॅक्स भरत आहे. तालुक्यातील बर्याच  ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराच जाळ पसरत आहे. माहिती अधिकारालाही जूमानत नाही. कालावधीत मागीतलेल्या माहिती अहवाल सादर करीत नाही. कधी कधी अनेकांना प्रश्न पडत असेल की सचिव व सरपंच,  उपसरपंच कायद्या पेक्षा मोठे का ? बर्याच ग्रामपंचायती अशाही आहे की त्यांच्या कामात,हिशोबात पारदर्शकता आहे.

एकून सर्व ग्रामपंचायतींना दोश देता येणार नाही. ऑरो प्लांट फिल्टर मध्ये ज्या ग्रामपंचायत ठेकेदाराने , पदाधिकारी आथवा राजकीय व्यक्ती असो या लाखो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे गुढ चौकशी करून तालुक्यातील भ्रष्टाचाराचे काळे चेहरे जनतेसमोर आणायलाच पाहिजे. कारण शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून लाखो रुपये शासनाचा खर्च झाला. एवढा खर्च होऊनही काही फिल्टर अनेक दिवसांपासून प्लांट बंद पडलेले आढळतात. या विषयाकडे जाणीव पूर्वक लक्ष देऊन चौकशी व्हावी अशे तालुक्यातील  नागरीकांच्या चर्चेतून दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...