वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): कोविड आजारामुळे अनेकांना आपले जवळचे व्यक्ती गमावावे लागले असून जिल्ह्यातील 479 बालकांनी आपले आई किंवा वडील कोविड मुळे गमावले आहेत. यातील 12 बालके असे आहेत कि ज्यांनी आई- वडील दोन्ही कोविडमुळे गमावले आहे. कोविडमुळे पालक गमावलेल्या 18 वर्षाआतील बालकांना सहाय्य म्हणून शासनाद्वारे विविध योजनांचा लाभ दिल्या जात आहे.
याचाच एक भाग म्हणून या बालकांच्या मदतीसाठी महिला व बाल विकास विभागाद्वारे बाल न्याय निधी जिल्ह्यास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अंतर्गत शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शालेय साहित्य खरेदी करीता आर्थिक मदत केल्या जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुक्यातील मिशन वात्सल्य समितीकडे तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका संरक्षण अधिकारी यांच्या कडे विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.
जिल्हा कृती दल मार्फत अर्जाची तपासणी करून गरजू बालकांना लाभ दिल्या जाणार आहे. बाल न्याय निधी द्वारे कोविडमुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांना शैक्षणिक शुल्क व शैक्षणिक साहित्य साठी मदत केल्या जाणार आहे. त्यामुळे गरजू बालकांनी त्वरित अर्ज दाखल करावे व अधिक माहिती करीता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक- यवतमाळ येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...