Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / शिक्षणाला खेळाची सांगड...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

शिक्षणाला खेळाची सांगड घालूनच सर्वांगिन विकास साधता येतो : प्रा. वसंत पुरके

शिक्षणाला खेळाची सांगड  घालूनच सर्वांगिन विकास साधता येतो : प्रा. वसंत पुरके

राळेगाव तालुका ( प्रतिनिधी)  :   राळेगाव तालुक्यातील झरगड येथे काराई गोराई माता देवस्थान व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घघाटन दिनांक २१/२/२०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड.प्रफुल्ल मानकर यांच्या  अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूणे  विदर्भ मार्केटींग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंद वाढोणकर,अंकुश मुनेश्वर, निश्चल बोभाटे,शामकांत येणोरकर, सरपंच झरगड सौ चंदा मोहन आत्राम,गजानन कुळकर्णी,प्रसाद कुळकर्णी, किशोर धामंदे, पुरूषोत्तम चिडे,प्रफुल्ल तायवाडे, सचिन राडे, मोहन आत्राम सर,प्रकाश झाडे,राजू राडे यांच्या उपस्थितीत पार पडला. दिनांक २१/२/२०२२ पासून १/३/२०२२ पर्यंत चाललेल्या कबड्डीच्या खेळात पस्तिस संघानी सहभाग नोंदवून आपला खेळ दाखवून प्रेक्षकांना आकर्षित केले.शेवटच्या दिवशी अंतिम सामना जय दुर्गा क्रिडा मंडळ परसोडी व  खटेश्वर क्रिडा मंडळ पिंपळगाव रूईकर यांच्यात काट्याची लढत होऊन प्रथम बक्षिस ३१,००० रूपये परसोडी संघाने पटकावले. तर द्धितीय बक्षिस २१००० रूपये पिंपळगाव रूचकर या संघाने पटकावले तृतिय बक्षिस १५००० रुपयेअंतरगाव चिखली या संघाने तर चौथे बक्षिस  ११००० रुपये झरगडच्या संघाने प्राप्त केले. 

या सामन्याच्या बक्षिस वितरणाला महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके सर, आदर्श ग्राम रावेरीचे सरपंच, विकासपुरूष राजेंद्र तेलंगे,बंजारा कर्मचारी संघटना राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावनसिंग वडते सर,सरपंच झरगड सौ चंदा आत्राम, तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अशोक काचोळे,दिलीप भोकटे, विश्वासराव किनवटकर, मोहन आत्राम सर,झाडगाव ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे ग्राम पंचायत सदस्य अनिल पंधरे,गावातील प्रतिष्ठित नागरिक गोविंदराव झाडे,अजाबराव आत्राम, राजू राडे,प्रकाश झाडे,विजय राडे यांनी प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामन्याचा आनंद घेतला. या सामन्याचे पंच म्हणून श्रावनसिंग वडते सर व राजू राडे यांनी चोखपणे बजावले.  खेळ संपल्यांनतर मा. पुरके सरांनी खेळाडूना मार्गदर्शन केले.  सर आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले कि ' शिक्षण आणि खेळाची सांगड घालूनच सर्वांगिन  विकास साधता येतो.'  हे चालत असलेले सामने यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते रवि राऊत,संभा पंधरे,संजू पचारे,महेंद्र उईके,प्रभाकर नेहारे,श्रमिक राडे,अंकुश वगारहांडे,गोपाल नेहारे, रमन पंधरे रविराज झाडे, चिंतामन लांभाडे,दिलीप राऊत,विनोद गेडाम,मनोज पचारे,ऋतिक झाडे,मनिष राऊत,विकास गजबे,राजू लढी,आशिष लाभांडे,निलेश लढी,गुड्डू आत्राम,सुनिल मेश्राम,प्रफुल्ल भोयर,ईत्यादी गावकऱ्यांनी परिश्रम  घेतले.कार्यक्रमाचे संचलन देवेंद्र आत्राम सर यांनी केले तर वडते सर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...