आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
राजु गागरे (प्रतिनिधी): झरी तालूका हा मागासवर्गीय तालूका आहे. आदिवासी बहुल म्हणून त्याची ख्याती आहे. पुर्वीपासून चा विचार केला तर पैनगंगेच्या तिरावर बसलेला व निसर्गरम्य नटलेला तालूका होय. या तालुक्यातील नागरीक अतीशय मागास असल्याने बर्याच प्रमाणात शासकीय कामासाठी प्रत्येक नागरिकांची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. विषेस म्हणजे या आधी तालुक्यातील प्रत्येक गावात पाटीलांच फक्त घर सुशिक्षित असायच. आता बर्याच प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. आणि हा बदल शिक्षणामुळेच नक्की झाला. शिक्षणामुळेच गरीबांचा एक तरी तरूण यूवक कोणी शिक्षक, कोणी बाबू, कलेक्टर, तहसीलदार, बीडीओ, तर कोणी भारतीय सैनिक, पोलिस, मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये अशा अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.
तरी सुद्धा कुठेना कुठे तृटी आहेच. समाज पुढे जाण्याला अडथळा आहे.अजूनही शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनाचा अभाव जाणवते. केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो अशा कीतितरी योजना आहे की त्या लोकांपर्यंत पोहचत नाही. अजूनही गरीबी मध्ये जीवन जगणारे अनेक योजनांपासून वंचीत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवत नाही. ग्रामपंचायत स्तरावर नागरीकांना एकूण योजनेची माहिती मिळेल असं कोणतंही नियोजन नाही. आपल्याच कामात व्यस्त असतांना दिसते.
जिल्हा परिषद योजना, पंचायत समितीच्या योजना, समाज कल्याण योजना, केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामपंचायत मार्फत लाभाच्या योजना अशा अनेक योजना आहेत. परंतू या योजनेबद्दल माहिती देणार कोण हा मोठा प्रश्न आहे. कृषी योजना शेतकर्यां पर्यंत पोहचत नसल्याने शेतकर्यांमध्ये उन्नतीचा अभाव. अस वाटायला लागलं की तालुक्यात जनतेच्या कल्याणासाठी तालुक्यात कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी एक केंद्र असाव. जेणेकरून योजनेची माहिती व योजनेचा लाभ लोकांना अडचन होणार नाही सविस्तर माहिती घेऊन योजनेचा लाभ घेता येईल. परंतु आपल्या विचाराने फरक पडणार काय हा प्रश्न आहे.
ग्रामपंचायत कामासाठी व जनतेच्या कल्याणासाठी सक्रीय असेल तरच एकूण योजना जनतेपर्यंत पोहचेल. बर्याच योजना आहे की नागरिकांना योजनेची माहितीच नाही. योजनेचे विषेस म्हणजे व्यक्ती जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत लाभ प्राप्त होईल ईतक्या सक्षम योजना आहे. शासनाने बनवलेल्या एकूण योजना जनतेच्या कल्याणासाठीच असतात. योजना म्हणजे सरकारने बनविलेल एक नियोजन होय. आर्थिक गरजा व सामाजिक क्षेत्रात जनतेच्या अडचणी पहता योजनेचे नियोजन केलेले असते.
स्त्री बाळंतपणाच्या योजना, सु कन्या योजना , माझी कन्या भाग्यश्री योजना, स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक योजना, स्कालरशीप च्या योजना, निराधार योजना, श्रावणबाळ योजना, बेरोजगारीसाठी योजना, विधवा महिलांसाठी योजना, अटल पेंशन योजना, विमा योजना, आयुषमान योजना, आरोग्याच्या योजना , विवाहासाठीच्या योजना,बळीराजा चेतना योजना, कृषी सहाय्यक योजना,एवढच नव्हे तर व्यक्ती संपल्यावर त्यांच्या परिवारातील नातलगांना योजनेचा लाभ मिळते, अशा ईतरही शेकडो योजना आहे. ज्या आपल्या पर्यंत पोहचत नाही.
या वर्तमान काळात प्रत्येक व्यक्ती मिडीया,समाज माध्यमातून लोकांशी जूळलेला आहे. मराठी, इंग्रजी गुगल ॲप वर अनेक योजनेच्या लिंक वरून माहिती मिळवीता येते. कोणत्याही योजनेला लागणारी कागदपत्रे सविस्तर माहिती गूगल ॲप वरून मिळवीता येते. कोणत्याही योजनेसंबधी माहीती प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचवा. पात्रतेनुसार शासकीय योजनांच्या लाभावर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो आर्थिक, दुर्बल परिस्थितील लोकांना झाला पाहिजे. तरच केंद्र व राज्य शासनाच्या योजनेला महत्व.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...