वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी ): आर्णी रोड वडगाव येथील सीताराम नगरी सरगर ले आऊट मधील अमेनिटी प्लॉटवर देवांगण लाण उभारण्यात आला आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते त्यामुळे या लानमाधील उत्सवी कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी परिसररातील नागरिकांनी केली आहे.
सीताराम नगरी सरगर ले आऊट वडगाव रोड येथील शेत सर्वे नंबर 37।1 प्लॉट नंबर 53 क्षेत्रफळ 20,20 चौरस मिटर वर पब्लिक अमेनिटी प्लॉट आहे या प्लॉटवर व्यावसायिक दृष्टिकोनातून देवांगण लाणं उभारला आहे मुळात अमेनिटी प्लॉटवर व्यावसायिक दृष्टिकोणातून कुठलीही वास्तू उभारता येत नाही पण येथे अशी वास्तू उभारून याठिकाणी लग्न ,वाढदिवस ,स्वागत समारंभ ,मौज आदी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम होतात ज्यामध्ये लाऊडस्पीकर फटाके बँड याचा सतत वापर केला जातो त्याचा परिसररातील नागरिकांना वृद्ध महिला व मुले याना त्रास होतो तसेच ध्वनिप्रदूषनामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिवाय लानमालकाने पार्किंगची कुठलीही व्यवस्था केली नाही त्यामुळे कार्यक्रम असल्यावर गाड्यांचा त्रास नागरिकांना होतो परिसरातील रस्ते बंद होतात लाणं मधील कार्यक्रम रात्री अकरा ते बारा पर्यंत चालतात कार्यक्रमात लाऊडस्पीकर, बँड ,फटाके, सर्व सुरू असतात तसेच कार्यक्रम संपल्यावर उरलेले अन्न लानच्या मागच्या बाजूला टाकून देण्यात येते परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते तसेच कार्यक्रम झाल्यावर लान स्वच्छता, स्वयंपाकाची भांडी धुणे घासणे आदी कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालते याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
परिसरातील नागरिकांनी याआधीच जिल्हाधिकारी ,मुख्यधिकारी यवतमाळ ,विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडे तक्रार दाखल केली होती पण त्यावर कोणत्याही प्राधिकरणाने कुठलीही कार्यवाही केली नाही महत्त्वाचे म्हणजे परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर दीड वर्षानंतर नगरपरिषदेने देवांगण लाणं येथे समारंभ स्थळ बांधकामाची परवानगी दिली आहे म्हणजेच बांधकाम आधी करून लानमलकाने परवानगी नंतर घेतली आहे.
पब्लिक अमेनिटी प्लॉटवर व्यावसायिक स्वरूपाचे बांधकाम करता येत नाही तेथे कोणतेही व्यावसायिक स्वरूपाचे कार्यक्रम घेता येत नाही असा कायदा असून बांधकामाचे स्वरूप व्यावसायिक आहे नगरपरिषद यवतमाळने कोणत्याही अटी न टाकता सरसकट बांधकामास परवानगी दिली आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी लोकशाही दिनातही तक्रार दिली आहे तेव्हा या तक्रारीची दखल घेऊन येथील उत्सवी कार्यक्रम तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...