Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / ग्रामपंचायत सदस्यां...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

ग्रामपंचायत सदस्यां मधील वादविवाद गाव विकासाला बाधा ठरणार || ग्रामपंचायत कारभाराचे योग्य नियोजन करणार तरच विकास करु शकणार.

ग्रामपंचायत सदस्यां मधील वादविवाद गाव विकासाला  बाधा ठरणार || ग्रामपंचायत कारभाराचे योग्य नियोजन करणार तरच विकास करु शकणार.
ads images

झरी:- तालुक्यातील सध्या काही ग्रामपंचायतीचा चालू असलेला कार्यभार पाहिल्यास काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत निवडनूक झाल्यावर कार्यालयात सरपंच व सभासद यामध्ये वाद विवाद गाव विकासास घातक ठरत आहे. वादविवाद न होता सलोख्याचे वातावरण असने फार महत्वाचे आहे. बर्याच ग्रामपंचायत मध्ये वाद झालेल्या घटना वृत्तपत्रातून वाचनात येताना तालुक्यातील जनता पाहते. ज्या ग्रामपंचायत मध्ये वाद विवाद होतात त्या ग्रामपंचायत क्षेत्राचा फारसा विकास होत नाही. हे प्रत्येक पंचवार्षिकला दिसून आले आहे. करण सभासद व सरपंच उपसरपंच यांच्यात वाद का होतात हे गावगाळ्यातल्या लोकांना माहिती असतेच. 

शासनाला फक्त वाद टोकाला गेल्या शिवाय माहीत होत नाही. वर्तमान स्थितीत आपन पाहतोय की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. एकापेक्षा अनेक पक्ष मिळून सत्ता स्थापन करता येते. नेमका  तोच फार्मुला बर्याच ग्रामपंचायत मध्ये सूद्धा आहे. यात आमच्या पक्षाचे काम त्या पक्षाच काम. उद्घाटन समारंभात आमच्या पक्षाला महत्व नाही का, वेळोवेळी हिशोब, आमच्या वार्डात काम देत नाही , हा ठेकेदार नको तो ठेकेदार नको, हा माझा मानूस तो विरोधक, या ठीकानी काम नको त्या ठिकाणी आवश्यक, त्यांना पैसे मिळाले मला नाही मिळाले.अशा कीतीतरी भानगडी असतात. कामा पर्यंत पोहचायच्या अगोदर यांच्याच भानगडीत वर्ष वाया जात असतात. सर्वप्रथम ग्रामपंचायत कारभार चालवायच्या नियोजनाकडे कुनाच लक्ष जात नाही. कर्मचारी सांगतात की मागच्यावेळी आम्ही अस केल ते ऐकून वर्तमान सरपंच व सभासद तेच करत असल्याचे बर्याच ठिकाणी दिसून येत असतात. स्वतामध्ये असलेल्या बुद्धीचा वापर करून नवीन योजना आखायला पाहीजेत. 

औरंगाबाद मधील पडोदा ग्रामपंचायत भास्कर पेरे पाटील अख्या महाराष्ट्रात प्रख्यात आहे. त्यांची ग्रामपंचायत कारभारामुळे प्रसिद्ध आहे. त्यांनी स्वतामधल्या अंगी असलेल्या गुणाचा वापर केला. ग्रामपंचायत कारभाराच्या तृटी शोधल्या. त्यावर कार्य केले. तेव्हा कुठे पुरस्काराने सन्मानित झाले. शेकडो सरपंचांनी व सभासदांनी भास्कर पेरे पाटलांच्या कारभाराची पाहनी केली. त्यांच्या पासून बर्याच गाव सरपंचांना गाव विकासक काम करण्याची प्रेरणा मिळाली. राज्याच्या जिल्ह्याचा विकासासाठी ग्रामपंचायत विकास फार महत्वाचे आहे. हे समजून घेतले पाहिजे.आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. राज्यात एकूण ग्रामपंचायती २७९०६ आहे आणि त्यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात १२०७ ग्रामपंचायती आहे. त्यात झरी तालुक्यात दरम्यान ५५ ग्रामपंचायत आहे. कोण्या एकाच व्यक्तीमुळे जिल्ह्यातील विकास शक्य नाही. जिल्हा स्तरापासून तर ग्रामपंचायत स्तरावर साखळी पद्धतीने प्रत्येक अधिकार्यांचे प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पार पाडने आवश्यक आहे. तरच जिल्हा विकास दिसून येईल. त्यामुळे  प्रत्येक ग्रामपंचायतीला गाव विकासाचा पुढाकार आवश्यक आहे. ग्रामपंचायत नियोजन व तरतूद समजून घेणे आवश्यक असतात.  ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार, प्राथमिक स्तरावरील संस्था म्हणजेच “ग्रामपंचायत” ही त्रिस्तरीय पंचायती राज मधील सर्वात महत्वाची संस्था आहे. ग्रामपंचायत ही निवडून आलेल्या प्रतिनिधींची एक अशी संस्था आहे ज्यांना जनतेला प्रत्यक्ष समोरासमोर उत्तर द्यावे लागते आणि बहुतेक क्रियाकलापांसाठी निर्णय घेण्यापूर्वी त्यांची संमती घ्यावी लागते.

  भारताच्या पंचायती राज व्यवस्थेत, एक गाव किंवा लहान शहर अशा स्तरावर ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा असते, जे भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य अंग असल्याचे मानले जाते. सरपंच हा ग्रामसभेचा सर्वोच्च निर्वाचित प्रतिनिधी असतो. प्राचीन काळापासून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात पंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. सार्वजनिक जीवनातील प्रत्येक पैलू त्यावर चालत असतो.

ग्रामपंचायतीचे स्वरूप आपण समजून घ्या. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? कि ग्रामपंचायत कशी बनते? किंवा यात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? ग्रामपंचायतीचे क्षेत्र कशावरून ठरवले जाते?  नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित करण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असतात. ग्रामपंचायत कारभार पाहनी साठी वरील आदेशाप्रमाणे कार्य सांभाळण्यास ग्रामसेवक शासकीय व्यक्ती असतात. 

प्राथमिक स्तरावरील ग्रामपंचायत संस्था सभासदाची स्थानिक जनता निवड करतात. त्या नंतर निवडणूक अधिकारी ३० दिवसाच्या आत  निवडून आलेल्या सदस्यांची बैठक बोलवतात. या बैठकीत सरपंच पदासाठी अर्ज भरावा लागतो. व सदस्य सरपंच,  पदासाठी निवड प्रक्रिया असते. ईतरही प्रक्रियेत शासनाने दिलेल्या निकशास अधीन राहून ग्रामपंचायत कारभार चालवायचा असते. नियोजन योग्य असेल तर कारभार योग्य असतातच. कोणत्याही कामासाठी योजना, नियोजन पक्के असने आवश्यक आहे. नाही तर काम करत असल्याचे फक्त दाखवनने होईल. पण काम होणार नाही. 

त्यासाठी भविष्यात वर्षानुवर्षे टीकेल  असं नियोजन  करणे आवश्यक. तरच शासनाचा निधी, पैसा व्यर्थ जाणार नाही. याची काळजी घेण्याच नियोजन आवश्यक. विज, पाणी, रस्ते , शौचालय, गाव स्वच्छता , शोष खड्डे, भवन, शाळा सौंदर्यीकरण, नागरीकांच्या आरोग्याची काळजी अशा ईतरही सार्वजनिक गरजा तपासून करणार. तरच ग्राम विकास निदर्शनात येईल हे मात्र नक्की.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...