Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा कारभार ।। विज तोडने सोपे पण जोडने कठीन.

महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांचा कारभार ।। विज तोडने सोपे पण जोडने कठीन.
ads images

झरी (प्रतिनिधी): झरी तालूक्यात महावितरण कंपनीचा ग्राहक सेवा कार्याकडे दूर्लक्ष होत असल्याचे चीत्र पहायला मिळत आहे. सध्या विज ही काळाची गरज बनली आहे. छोटे गावाचा दिवसेनदिवस विस्तार होऊन शहरी स्वरूप यायला लागले. त्यामुळे विजेची मागणी कायम आहे. मुकूटबन शहरा सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या परीसरात १३२ केव्ही पाॅवर स्टेशन अत्यावश्यक बनले आहे. वेळेवर उपाय योजना केल्या असत्या तर विजेची समस्या उद्भवल्या नसत्या. सोबतच विज ग्राहकांच्या सेवेचा मोठा प्रश्न आहे. 

 वसूली साठी विज कर्मचारी एखाद्याची विज तोडायची झाल्यास कोणतीही सूचना न देता मोठ्या ऊत्साहाने लवकरात लवकर घरी पोहोचतात. घरी व्यक्ती असो किंवा नसो विज कट करुन मोकळे होतात. त्याच विज ग्राहकाने बील भरल्यानंतर जोडायचे असल्यास हेलपाटे माराव्या लागतात. तोडने सोपे जोडने कठीण. नवीन विज कनेक्शन घ्यायचे असल्यास ज्यादाचे पैसे घेऊनही हेलपाटे माराव्या लागतात. हा प्रकार सर्रास चालू आहे. यामुळेच महावितरण कंपनी फेल ठरत आहे. विजेच्या लपंडावाचा संपूर्ण तालूक्याला फटका बसत आहे. विज गुल होण्याला काही नवल राहले नाही. सेवा देनार्या कर्मचार्यांचे काम पाहता डीस्ट्रीबुशन बाॅक्स मध्ये धागे दोरे बांधल्या सारखे काम आहे. अनेक खांबावर बर्याच ठीकानी लाईनमेन काम करताना दिसत नाही. गावगाळ्यातील विना परवाना व्यक्तीला घेऊन काम काढून घेतात. काम करण्याच्या बदल्यात नविन कनेक्शन साठी आलेले मिटर बसवायला देतात. त्याचे १००,२०० रूपये ज्याच्या नांवाचें मिटर असेल त्यांच्या कडून वसुल करतात. गावातील एखाद्याचे वायर तूटले असतील खराब झाला असतील तर जोडण्यास सांगतात. घरघूती विज कनेक्शन केल्याच्या बदल्यात 100,200 रूपये घरवाल्यांकडूनच वसूल करतात. तोच गावगाळ्यातल्या व्यक्तीचा मोबदला. खरं तर विजेवर काम करण्याचा सूद्धा परवाना लागतो. विजेवर अथवा विज खांबावर काम करण्याचा परवाना लागतो. हे महावितरण कंपनी कर्मचार्यांना माहीत असायला पाहीजे. 

खांबावरच्या कामाचा विचार केला तर अनाधिकृत व्यक्तींकडून अधिकृत प्रशिक्षीत कर्मचार्यांसारखे काम करता येत नाही. विना प्रशिक्षीत व्यक्तीचे काम ओबडधोबड होईल. त्यामुळे नंतर स्पार्किंग होने, आग लागने, घटनेला सामोर जावे लागते. अशा कार्याला जबाबदार फक्त महावितरण कर्मचारीच. मुख्य लाईनमेनला कोणते अधिकार आऊसोर्सिंग कामगारांना कोणते अधिकार हे स्थानीय लोकांना काहीच माहीती नसल्याचे पहायला मीळत आहे. महावितरण मधील आउटसोर्सिंग कामगार वेळ काढू काम करत असल्याचे दिसत आहे. एकच काम तिन वेळा करतात. कामाचा काहीच अनूभव नसल्याचे दीसून येते. कीती लोडवर कोणता फ्युज टाकायचा याचा कवडीचा अनुभव नाही. त्यामुळे झरी तालूक्यातील ज्यास्तीत ज्यास्त ठीकानी डिस्ट्रीब्यूशन बाॅक्स मध्ये ठोकळ बारीक जर्मनी तार गुंडाळलेली पहायला मिळते. अनेक 11 केव्ही जंपरवर स्पार्किंग होत असते.  त्यांच्याच टाईमपास केलेल्या कामामुळे चुकीमुळे 11 केव्ही तार तूटतात. फक्त वरीष्ठ अधीकार्यां पर्यंत चुक पोहचत नाही. 

याकडे महावितरण वरीष्ठ अधीकार्यांनी लक्ष देने गरजेच आहे. कारण  यांच्या टाईमपास कामाच्या चुकीमुळे  तासंतास विज बंद राहते. त्यामुळे महावितरण कंपनीचे नुकसान तर होतच असते सोबतच विजग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागते. अनेक गावांत लक्ष दिल्यास तारा ढील्या झालेल्या अवस्थेत आहे. कीतीतरी कालावधी होऊनही मेंटनन्स नाही. अनेक ठीकानी नाली काठावरील लोखंडी पोल जमीनी जवळ सडताना दिसते. काही डिपीवरील आरमड केबल विजप्रवाहीत जीवंत असलेले ऊन्हाच्या उष्णतेने ईन्सूलेशन (कव्हर) खराब होऊन जर्मनी तार दिसायला लागल्या. अशावेळी जनावरे स्पर्श होऊन विजेचा शाॅक लागून मृत्यु होऊ शकते. या सर्व प्रश्नांकडे महावितरण कंपनी अधिकार्यांनी  लक्ष देने गरजेचे आहे. विज ग्राहक डिमांड भरण्यासाठी कॅश काऊंटर झरी येथे पोहचत नाही. कारण विज कर्मचारी पोहचू देत नाही. विज ग्राहकांची दीशा भुल करतात डिमांड च्या नावावर ज्यास्तीचे पैसे परस्पर घेतात. त्यातच कर्मचार्याची बदली झाली तर पैसे बुडालेच समजा. अशे प्रकार आजपर्यंत होतच आले. या पूढेही होऊ नये यासाठी प्रत्येक महावितरण कार्यालयात विज ग्राहकांच्या सोयीचे नियोजन व्हावे. अशी संपूर्ण तालुक्यातील जनतेची मागणी आहे.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...