वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव (प्रतिनिधी): मारेगाव तालुक्यात वर्षभरात आत्महत्येचे सत्र सुरू असताना आज सिंधी येथील एका 30 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. हे सत्र कधी थांबेल याचे विवेचन करण्याची गरज तालुक्याला आहे असे तालुक्यात चर्चा वर्तवली जात आहे. मारेगाव तालुक्यातील सिंधी (महागाव) येथे एका 30 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आज संध्याकाळी 07.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव मारोती वैद्य (वय 30) असे मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. वैभव ची पत्नी गर्भवती होती. ती डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती.
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोज गुरुवारी रोजी सकाळी मयत वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. 07.30 वाजताच्या सुमारास ही घटना वैभवच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. पोलीस पाटील संतोषराव निब्रड यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वैभवकडे 3 एकर शेती आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली सध्या तरी कारण समजू शकले नाही.
एक वर्षापूर्वी वैभवचे वेगाव येथील मुलीसोबत लग्न झाले होते. घटनेचा तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे. कुटुंबात काही दिवसांनी बाळ येण्याच्या आधीच वैभवने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...