Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / उमरी येथे छत्रपती शिवाजी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी...

उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी...

आशा वर्कर सहित इतर मान्यवरांचा करण्यात आला सत्कार

प्रवीण उद्धवराव गायकवाड( राळेगाव तालुका प्रतिनिधी ): कळंब  तालुक्यातील इंदिरा चौक उमरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले,सूर्योदय कोचिंग क्लासेस राळेगाव चे संस्थापक प्रा.निखील राऊत सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरीत्र्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शारीरिक प्रमुख श्री महेशजी धनरे,प्रमुख पाहुणे भाजपा कळंब तालुका अध्यक्ष कैलासजी बोंद्रे,शहर प्रमुख संदीप वैद्य,कळंब तालुका सरचिटणीस सुरेशजी होरे,तालुका कार्यवाह शंतनुजी लखपती,अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष सतीश मरापे,अनुसूचित जमाती तालुका अध्यक्ष तुषार शेंडे,मच्छीभाव सेल प्रमुख कळंब तालुका पप्पुजी मोहिते तसेच गावातील सरपंच सौ.अर्चनाताई एकोणकर उपसरपंच किशोर रोकडे,ग्रामपंचायत सदस्य आशिष भोयर, जयश्रीताई मडावी,विद्याताई वनारसे,लताताई बावणे,यांची उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र्यावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन गट असे व गट ब अशा दोन गटात करण्यात आले होते.
अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. प्राची चंद्रशेखर गवारकर,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जान्हवी वामनराव वाईकर,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक चैताली चंद्रशेखर गवारकर व ब गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. आचल ज्ञानेश्वर चौधरी,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कु.गौरी चंद्रशेखर कोहपरे,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गौरव वामनराव वाईकर या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसेच कोरोणा काळात उत्कृष्ठ लसीकरण मोहीम राबवल्याबद्दल आशा वर्कर सौ.लताताई रामगडे यांना सन्मानचिन्ह व साडीचोळी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील मटका पट्टी बंद केल्याबद्दल श्री.भाऊरावजी गवारकर यांचे ग्राम पंचायत उमरी येथील सर्व सदस्यांनी आभार मानून मान्यवरांच्या हस्ते शब्दसुमनांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तर छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ उमरी यांनी या उत्सवास अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज रोकडे व प्रास्ताविक राजेंद्रजी एकुणकर सर यांनी केले या कार्यक्रमामध्ये गावातील महिला मंडळ,सामाजिक मंडळ,युवा मंडळ यांची उपस्थिती होती व आभार प्रदर्शन प्रतिक गोहने यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...