आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ, चांदोरे नगर, मोहा फाटा, यवतमाळ येथे सत्यशोधक ओबीसी, एससी, एसटी युथ फ्रंट यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये मानवी मूल्याचा रास कशा पद्धतीने आहे आणि भारतीय संविधानाची मूल्य त्यामध्ये कशा पद्धतीने नाकारला गेलेली आहे, याचे विस्तृत विवेचन प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड सामाजिक विचारवंत, औरंगाबाद , यांनी मांडले. सत्यशोधक ओबीसी, एससी, एसटी फ्रंट या कार्यशाळेमध्ये अध्यक्षस्थानी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, अध्यक्ष भारतीय (पीछडा)ओबीसी संघटन, महाराष्ट्र राज्य, तथा उपाध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा हे होते.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रभाकर गायकवाड, विलास काळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य भारतीय (पीछडा)ओबीसी संघटना, उपाध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा. गणेश ओकार ,अध्यक्ष सत्यशोधक शिक्षक संघटना, उपस्थित होते कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व विद्यार्थ्यांना पुढील आव्हाने या विषयावर अतिशय सरळ साध्या व सोप्या भाषेत मा. डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडला. शब्दछल करून सरकार शैक्षणिक धोरण २०२० अतिशय गोंडस पणे आपल्यावर थोपवीत आहे.
परंतु भारतीय संविधानाची मुल्य त्यात रुजवल्या जाण्याची शक्यता कमी आहे, असं ते म्हणाले.
आपण या सगळ्या प्रक्रियेला बळी पडू नये, आपल्यामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे, या पद्धतीचे भूमिका त्यांनी व्यक्त केली.
ओबीसी, एससी, एसटी या घटकातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र त्यांनी समजावून सांगितले व लोकांनी आपल्या डोळ्यावर अंधाराची पट्टी लावली आहे ती काढून सत्य शोधावे अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शन विलास काळे यांनी समाज विकासाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका या विषयावर त्यांनी विचार पटवून दिले.
त्यामाध्यमातून टॅलेंट टाईम याचे महत्त्व त्यांनी समजून सांगितले. समाज प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी आपण आता जागृत झाले पाहिजे आणि जागृती करणे अनिवार्य आहे ही भूमिका त्यांनी मांडली. हे सगळे आपल्या विकास् विरोधी षड्यंत्र समजल्यावरही जनतेला मनस्ताप का होत नाही, आवाज का उठवत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष का करते,
असे प्रश्न आपल्याला पडत आहेत, परंतु त्या प्रश्नाचे उत्तर आपण का शोधत नाही याचे विस्तृत विवेचन त्यांनी या ठिकाणी केले.
विद्यार्थी मित्रांनी व त्यांच्या पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अशीच पाच दिवसीय कार्यशाळा लवकर आयोजित केल्या जाणार आहे, असे डॉक्टर न्यानेश्वर गोरे, अध्यक्ष यांनी मांडले.
या प्रसंगी माननीय सुनिता काळे यांनी येणाऱ्या पिढीला हे कसे घातक आहे,हे विस्तृतपणे मांडले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी आदिती फुसे,शेजल फेंडर,यांनी केले.
अनेक विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रश्न विचारले आणि आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजक अक्षय शेंडे, समीर काळे ,चेतन दरणे, स्वप्नील महादेशवार, सेजल फेंडर ,आदिती फुसे, सायल वाघ. अभ्युदय गोरे, अभिजीत सरडे, प्रणील मादेशवार ,प्रणय दायदार ,बंटी गोबरे ,योगेश महजनकार,अनुराग शाहाडे,सार्थक बारी, अंश गटलेवार ,अपूर्वा साखरकर कमलताई खंडारे ,मायाताई गोरे ,माधुरी फेंडर ,अनिता गोरे ,वैशाली फुसे ,प्रा,सविता हजारे, रेखा कोवे ,सुधा वाघमारे अश्विनी दायदार ,ज्योती खेडकर सुजाताला लाहाडके. ,यांनी केले . तर आभार प्रदर्शन निता दरणे यांनी मानले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...